मेट्रोतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात ; ज्यात धावत्या मेट्रोत गाणं सादर करणे, फॅशन शो करणे, व्यायाम , अनोखे स्टंट, होळी सेलिब्रेशन तर भांडण, अश्लील कृत्ये सुद्धा करताना अनेकदा दिसून येतात. पण, आज एका प्रवाशाने हद्दच पार केली आहे.व्यक्ती मेट्रो स्थानकाच्या एस्केलेटरवरून जाताना एका महिलेच्या पँटवर तंबाखू खाऊन थुंकला आहे.

दिल्लीतील एका महिलेबरोबर धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीच्या मेट्रो स्थानकाच्या एस्केलेटरवरून महिला जात होती. तिच्यामागे एक पुरुष तंबाखू चघळत होता. बघता बघता व्यक्ती तंबाखू खाऊन महिलेच्या पँटवर थुंकला.सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, त्याने केलेल्या या वाईट कृत्याबद्दल त्याला अजिबात पश्चात्ताप सुद्धा झाला नाही. एकदा पहाच महिलेनं शेअर केलेली पोस्ट.

हेही वाचा…आंब्यांचे गणित! विक्रेत्याची स्टाईल पाहून व्हाल अवाक्; PHOTO पाहून वही-पेन घ्याल हातात

पोस्ट नक्की बघा…

याव्यतिरिक्त महिलेनं पुरावा म्हणून डाग दिसणाऱ्या पँटचा फोटो शेअर केला आहे. तसेच तिने दावा केला आहे की, ही चूक त्याने जाणूनबुजून केली आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती तुमची चूक करते तेव्हा ती सहसा सॉरी म्हणते. पण, त्या व्यक्तीने तसे काहीच केलं नाही. तसेच तिने पुढे हेही सांगितले की, महिलेनं जीन्स साफ केल्यानंतर स्वतःचा रुमाल त्या व्यक्तीकडे रागात फेकला तेव्हा त्याने तो रुमाल त्याच्याजवळ ठेवून घेतला आहे. हे तुम्हाला फोटोत सुद्धा दिसून येईल.

ऋषिका गुप्ता असे या महिलेचं नाव आहे. महिलेनं सर्व घटना @rishikagupta__ तिच्या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून एका पोस्टद्वारे शेअर केली आहे. तसेच या पोस्टमध्ये त्या व्यक्तीचा हातात रुमाल धरलेला फोटो सुद्धा शेअर केला आहे. ही घटना पाहून अनेक जण या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत.