सोशल मीडियावर वन्यप्राण्यांचे कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ प्राण्यांच्या शिकारीचे असतात. अनेकदा वन्यप्राणी मानवी वस्तीच शिरकाव करतात त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. सध्या असाच एका मगरीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ फ्लोरिडामधील आहे. एका तळ्याच्या काठी घर असलेल्या रहिवाशाच्या घरामध्ये एक मगर शिरण्याचा प्रयत्न करत आहे तेवढ्यात पुढे असे काही घडले जे पाहून नेटकरी पोट धरून हसत आहे.

नतालिया रोजासने (natalia_rojas_art) नावाच्या इंस्टाग्रामवर हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. या घटनेचा खरा हिरो महिलेचा पाळीव कुत्रा पिंटो ठरला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एका महिला काचेच्या दाराशेजारी उभी बाहेर राहून डोकावते आहे. दाराच्या बाहेर अंगणामध्ये एक मगर दिसत आहे. मगरीला पाहून घरातील सदस्य चिंतेत आहेत. तेवढ्यात महिलेचा पाळीव कुत्रा दारासमोर उभा राहतो आणि मगरीला पाहून जोरजोरत भुंकतो. कुत्र्याचे भुंकणे ऐकून मगर घाबरते आणि तेथून धुम ठोकते. अंगणातून पळत जाऊन मगर थेट घरासमोरील तळ्यामध्ये उडी मारताना दिसत आहे. मगरीचा सामना करावा लागणे हा भितीदायक अनुभव आहे. सुदैवाना काचेच्या दारामुळे मगर घरात प्रवेश करू शकली नाही. पण ज्या पद्धतीने ही मगर कुत्र्याला पाहून पळून जाते ते पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Florida womans pet dog scares off alligator nail biting video is viral snk
First published on: 24-04-2024 at 19:32 IST