आजकाल लोक खऱ्या आयुष्यात कमी आणि सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. प्रत्येकाला सोशल मीडियावर प्रसिद्धी हवी असते. हे लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करतात. कधी कोणी मेट्रोमध्ये डान्स करताना दिसते तर कोणी रस्त्यावर डान्स करताना दिसते. कोणी जीवघेणा स्टंट करताना दिसते. सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ करण्यासाठी वारंवार मनाई करण्यात येते. अनेकांवर त्यासाठी दंडात्मक कारवाई देखील केली जाते. दरम्यान आता पोलिसाच्या गणवेशातील एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर काही फॉलोअर्स वाढवण्यासाठी लोक आज काल काहीही करत असतात. दरम्यान आता चक्क रेल्वे स्टेशनवर पोलिसाच्या गणवेशामध्ये नाचणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोलिसाच्या गणवेशातील महिलेच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महिला पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहून व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या तरुणीला ट्रोल केले आहे.

हेही वाचा – भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ

हेही वाचा – भांडी घासावी लागू नये व्यक्तीने शोधला भन्नाट जुगाड! हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ

हा व्हिडीओ Shiya Thakur नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये विविध महिला पोलिसांचे व्हिडीओ पोस्ट केल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओला नेटिझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

एकाने लिहिले: “अरे देवा, काय प्रकरण आहे?”

हेही वाचा – बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल

दुसऱ्याने लिहिले: “कमीत कमी गणवेशाचा आदर करा

तिसऱ्याने लिहिले की, “नागरिकांना काय समवजावून सांगाल जर सार्वजनिक ठिकाणी पोलीस नाचत असतील तर?”

आणखी एकाने लिहिले , “गणवेश हाच आमचा अभिमान आहे, गणवेश घालून नाचणे, गाणे, व्हिडिओ बनवणे आणि ते इन्स्टाग्रामवर पोस्ट करणे एखाद्या व्यक्तीला शोभत नाही.”