Pakistan Viral Video: देशाला स्वातंत्र्य मिळताना भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. हे फक्त दोन देशांचे विभाजन नव्हते तर घर, कुटुंब, नातेसंबंध आणि भावनांचे विभाजन होते. लोकांचे नशीब एका रात्रीत बदलले, लाखो लोक बेघर झाली तर काही द्वेषाच्या तलवारीच्या सपासप वाराने संपले. कुणाचे भाऊ-बहीण सीमा ओलांडून गेले तर कुणी कुटुंब, मालमत्ता इथेच सोडून पाकिस्तानला गेले. बंधूभावाने राहणारे दोन धर्माचे लोक अचानक एकमेकांचे शत्रू झाले. या फाळणीने दोन्ही समाजाच्या लोकांच्या हृदयात द्वेषाची अशी काही दरी खणून काढली, जी आजपर्यंत भरुन निघू शकली नाही. दरम्यना सध्या पाकिस्तानमधल्या एका मराठी माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पाकिस्तानमध्ये असणाऱ्या या मराठी माणसाचं मराठी ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.

मुंबईमध्ये सर्वात प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. मुंबईकरांचं आणि वडापावचं नातं अगदी वेगळंच आहे. आनंदाच्या क्षणी असो वा दुखाच्या क्षणी, पोटाची भूक भागवण्याचा उत्तम आधार म्हणजे वडापाव.असा हा गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच प्रेमात पाडणारा वडा पाव आता केवळ भारतापूरताच मर्यादित राहिलेला नाही तर पाकिस्तानातही पोहचलाय. होय, पाकिस्तानमध्ये वडापाव विकणाऱ्या एका मराठी माणसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही एका मराठी कुटुंब पाहू शकता. हे कुटुंब कराचीमध्ये वडा पाव विकण्याचं काम करत आहे. परमेश श्री जाधव, त्यांच्या पत्नी मधू आणि वहिनी शारदा हे तीघं मिळून भारतीय पदार्थांचा स्टॉल चालवतात. या स्टॉलवर ते मसाला डोसा, व्हेजिटेबल नूडल्स, मोमोज, पाव भाजी, ईडली सांबार हे पदार्थ विकतात. पण त्यांच्या स्टॉलचं खरं आकर्षण आहे ते मुंबईचा वडा पाव. हा वडा पाव खाण्यासाठी पाकिस्तानी खवय्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “प्रयत्नांची उंची जिथे मोठी तिथे नशिब” भाजी विकणारा तरुण मुंबई पोलिसात भरती; VIDEO पाहून येईल डोळ्यात पाणी

पाकिस्तानमधील मराठी कुटुंबाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर धीरज मानधनने शेअर केला. या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले की आहे, “पाकिस्तान विविध संस्कृतींनी परिपूर्ण आहे. पाकिस्तानमधील मराठी कुटुंब तुम्हाला दाखवत आहोत. हा संपूर्ण व्हिडिओ युट्युब चॅनेलवर येत आहे.”

या व्हिडीओखाली लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत तर काही लोक पाकिस्तानवर टीका करत आहेत. काका मराठी एकदम कडक, आमच्याकडुन खुप प्रेम, जय शिवराय अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.