Mumbai : स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्राची राजधानी मुंबई प्रत्येकाला हवीहवीशी वाटते.दरदिवशी हजारो लोकं मुंबई दर्शनाला येतात. येथील काही लोकप्रिय ठिकाणी भेट देतात. गेट वे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, मरीन ड्राइव्ह, कुलाबा, हाजी अली दर्गा, सिद्धिविनायक गणपती इत्यादी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत, जे बघायला लोकं दुरवरून येतात. लोकं या पर्यटन स्थळी भेट देतात आणि आवडीने फोटो काढतात. काही लोकांच्या फोटो काढतानाच्या अनेक पोझ ठरलेल्या असतात पण तुम्हाला माहिती आहे का गेट वे ऑफ इंडियाला अनेक जण एकच आयकॉनिक पोझमध्ये फोटो काढताना दिसतात. तुम्हाला ती आयकॉनिक पोझ माहिती आहे का? सध्या सोशल मीडियावर या आयकॉनिक पोझविषयीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनेक जण ही आयकॉनिक पोझ देत फोटो काढताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी सांगते, “मी गेटवे ऑफ इंडियाजवळ आहे आणि येथील लोकप्रिय पोझमध्ये तुम्ही कधी फोटो काढली आहे का?” त्यानंतर ही तरुणी ही आयकॉनिक पोझ देणाऱ्या अनेक लोकांना व्हिडीओमध्ये दाखवते. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात ही आयकॉनिक पोझ देताना दिसतात. ही पोझ पाहून तुम्हालाही हसू येईल. काही लोकांनी आयुष्यात कधीतरी गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली असेल तेव्हा या आयकॉनिक पोझमध्ये फोटो काढलाच असेल.

आयकॉनिक पोझ कोणती आहे?

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की काही लोकं ताज हॉटेलच्या वास्तूसमोर दूर उभे राहतात आणि वर हात करतात. त्यानंतर समोरचा व्यक्ती जेव्हा फोटो काढतो तेव्हा ती वास्तू त्याच्या हाताखाली येते. जेव्हा तुम्ही या पोझमध्ये फोटो काढता तेव्हा ही भव्य अशी वास्तू तुमच्यापेक्षा खूप लहान दिसते आणि तुम्ही या वास्तूपेक्षा खूप मोठे दिसता. फक्त गेटवे ऑफ इंडिया परिसरातच नाही तर इतर अनेक ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी लोकं या पोझमध्ये फोटो काढतात.

हेही वाचा : VIDEO : “मटणाचा रस्सा केला वाटून घाटून..” महिलेनी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

shrutii.lanjekar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या तरुणीने हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गेटवे ऑफ इंडियाजवळची आयकॉनिक पोझ. या पोझला आयकॉनिक पोझ का म्हणत आहे कारण आम्ही एक ते दिड तास गेटवे ऑफ इंडियाजवळ घालवला. या दोन तासामध्ये जवळपास १०० हून अधिक लोकांनी या पोझमध्ये फोटो काढला. मग ही पोझ कॅमेरात का कैद करू नये. तुम्ही काढला आहे का या पोझमध्ये फोटो?
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “महाराष्ट्रीयन ही पोझ कधीही सोडणार नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “राष्ट्रीय पोझ घोषित करायला पाहिजे” आणखी एका युजरने लिहिलेय, “आम्ही पण या पोझमध्ये फोटो काढला आहे” अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.