देशभरात लग्नाचा माहोल सुरु आहे. अनेक ठिकाणी ढोल-नगाडे वाजतायत, वराती निघतायत.लग्नाचा दिवस व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असतो. सोशल मीडियावर ह्व्यूज आणि लाइक मिळवण्याच्या नादात लोक क्रिएटिव्ह होत आपले लग्न संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत सतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला पाहून वाटते की, जर लग्न समारंभात सावधानता बाळगली नसल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. अशाच एका दुर्घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नवरा-नवरीच्या हटके एन्ट्रीचा फटका फोटोग्राफरला बसला आणि त्याच्या केसाला आग लागली. लग्नातला थरार व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या लग्न म्हटलं तर खुप मोठ सेलिब्रेशन असते. कपलच्या एंट्रीवर फटाके फोडले जातात. काही ठिकाणी तर कपलच्या एंट्रीवर फायर क्रॅकर बसवले जातात. तर काही नवरा-नवरी स्वत: च गण हातात घेऊन रॉयल एन्ट्री मारत असतात.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा नवरीची स्टेजवर एन्ट्री होताच, स्टेजच्या चारही बाजूने त्यांच्या स्वागतासाठी फायर क्रॅकर उडवले जातात. यावेळी नवरा नवरीचा हाच क्षण कॅमेरात टिपण्यासाठी फोटोग्राफर तिथे उभा असतो. मात्र जशी एन्ट्री होते तसे स्टेजच्या बाजूने आग निघते आणि याच फायर क्रॅकरमुळे फोटोग्राफरच्या केसांना लागते. यावेळी फोटोग्राफरचे केस जळताना दिसत आहे. फोटोग्राफर लगेच हातातला कॅमेरा खाली ठेवतो आणि स्वत:चा बचावर करण्यासाठी इकडे तिकडे पळतो. हल्ली प्रत्येक क्षणाच्या फोटोसाठी जोडप्यांचा हट्ट असतो तसेच लग्नात प्रसिद्धीसाठीही वेगवेगळे स्टंट केले जातात. मात्र याचे काय परिणाम होतील याचा कुणीही विचार करत नाही.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C3jRhWPKIIU/?igsh=MTAxdjZ2NDg1eGpodA==

हेही वाचा >> भाऊ बहिणीचं प्रेम! भाऊ विमानात आला आणि कळले आपली बहिणच पायलट आहे; VIDEO व्हायरल

लग्नाच्या दिवसाला पार्टीसारखे सेलिब्रेट करतात आणि आयुष्यातला महत्वाचा दिवस खऱाब करतात, असे या व्हिडिओच्या कॅप्शनला म्हटले आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त व्युज मिळाले आहेत. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. फोटो काढण्यासाठी जसे त्यांनी गन फायर केले त्यापैकी नवरीच्या हातातील बंदुकीचा स्फोट झाला व नवरीचा चेहरा भाजला. अशीही एक घटना मागे घडली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photographers hair burning wedding video viral on social media srk
First published on: 26-02-2024 at 14:42 IST