Drunk Sunny Deol Spotted at Mumbai : बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सनी देओल अलीकडेच ‘गदर २’ चित्रपटामुळे चर्चेत आला होता. तब्बल २२ वर्षांनंतर चित्रपटाच्या या दुसरा पार्टला बॉक्स ऑफिसवरही तुफान प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर सनी देओलकडे एकापाठोपाठ एक सिनेमांच्या रांगा लागल्या आहेत. यातच सनी देओलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात मुंबईच्या रस्त्यावर तो दारुच्या नशेत अडखळत चालताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सनी देओलच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण सनी देओलची अशी अवस्था पहिल्यांदाच पाहायला मिळाली आहे. पण त्याची ही अवस्था कशी झाली असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.
व्हायरल झालेल्या हा व्हिडीओ मुंबईतील जुहू सर्कल परिसरातील असल्याचा दावा केला जात आहे, सनी देओल यावेळी मद्यधुंद अवस्थेत चालत होता असे म्हटले जात आहे. नशेमुळे त्याला नीट चालता येत नसल्याने तो चालत्या रिक्षाला जाऊन धडकतो. पण चालक रिक्षा थांबवत त्याला सांभाळतो. सनी देओलची ही अवस्था पाहून तो त्याला पकडून रिक्षात बसवतो. यावेळी सनी देओल त्याच्याशी बोलताना आणि हसताना दिसत आहे. या घटनेवेळी व्हिडीओ रिकॉर्ड करणाऱ्या व्यक्ती रिक्षा चालक फटकारतो. हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहतेही शॉक झाले आहेत.
दरम्यान सनी देओलचा हा व्हायरल व्हिडीओ फेक असल्याचे सांगितले जात आहे. यावर काहींनी म्हटले की, सनीने खरोखर दारु प्यायली नसून हा त्याचा आगामी चित्रपटाचा भाग आहे. त्यामुळे या व्हिडीओसंदर्भात कोणतीही सत्यता अद्याप समोर आलेली नाही.
कुणी करतंय ट्रोल तर कुणी करत समर्थन
दरम्यान काही चाहत्यांना सनी देओलने यापूर्वी केलेलं विधानं आठवत आहे. सनी देओलने अलीकडेच दावा केला होता की, त्याने वर्षांपूर्वी दारू सोडली होती आणि आता तो त्याला हातही लावत नाही. पण सनी देओलचा हा व्हिडिओ पाहून लोक त्याला चांगलेच ट्रोल करत आहेत.
एका युजरने लिहिले की, ‘तो या स्थितीत आता पाकिस्तानशीही लढू शकतो.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘जर तुम्ही दारू पिऊन रस्त्यावर फिरत असाल तर कोणीतरी तुम्हाला गाडीने उडवून देऊ शकते.’ पण हा शूटिंगचा भाग असल्याचा संशय काही चाहत्यांनी व्यक्त केला आहे.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत. सध्या सनी देओल मुंबईत त्याच्या ‘सफर’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अशावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा त्याच्याच शूटिंगचाच एक भाग असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. कारण सनी देओल अशी चूक करणार नाही हे उघड आहे. त्यामुळे चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही. सनी देओल शेवटचा ‘गदर 2’ मध्ये दिसला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.