कुत्रा हा असा प्राणी आहे जो माणसाचा खूप जवळचा मानला जातो. अनेक जण आवडीने कुत्रा पाळतात. कुत्र्यावर जीवापाड प्रेम करतात. त्याला सखा आणि मित्र समजतात. कुत्रा सुद्धा तितकाच त्याच्या मालकावर प्रेम करतो. कुत्रा हा वेळोवेळी त्याचा प्रामाणिकपणा दाखवतो. वेळ आली तर मालकाचा अंगरक्षकी होतो.

सोशल मीडियावर कुत्रा मालकाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही कुत्र्याला कधी मजामस्ती करताना पाहिले असेल तर कधी त्याचा प्रामाणिकपणा पाहिला असेल. पण जेव्हा कुत्रा अंगरक्षक होतो तेव्हा काय करू शकतो, याची कल्पना तुम्ही कधी केली आहे का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याने चिमुकलीचा जीव वाचवला आहे. मरणाचे नाटक करून कुत्रा चिमुकलीला अपहरणकर्त्यापासून वाचवताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : “मला नवरा पाहिजे” रडत रडत चिमुकलीने केला आईकडे हट्ट, व्हिडीओ एकदा बघाच…

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ एका घरातील आहे. या व्हिडीओमध्ये घराच्या अंगणात एक चिमुकली खेळत असते आणि तिच्या शेजारी कुत्रा बसलेला असतो. अचानक एक अपहरणकर्ता तिथे येतो. अनोळखी व्यक्तीला पाहून उठतो पण तितक्यात अपहरणकर्ता त्याला गोळी मारतो तेव्हा कुत्रा जागीच पडतो. अपहरणकर्ताला वाटते की कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. तो चिमुकलीचे अपहरण करण्यासाठी तिला उचलतो पण तितक्यात अचानक कुत्रा जागा होतो आणि या अपहरणकर्त्याच्या तावडीतून चिमुकलीला सोडवतो. व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की कुत्रा मरणाचे नाटक करत होता. कुत्र्याचा हे वागणे अनेकांना आवडू शकते. कुत्र्याची ही हुशारी पाहून कोणीही थक्क होईल.

@TheFigen_ या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुलीला वाचवण्यासाठी कुत्र्याने केले मरणाचे नाटक. याच कारणामुळे कुत्रा हा आपला जीवलग मित्र आहे. हिरो कुत्रा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या कुत्र्याचे कौतुक केले आहेत. काही लोकांनी कुत्र्याचे सुंदर व्हिडीओ सुद्धा शेअर केले आहेत.