Son Surprised Father With UPSC 2023 Result In His Office : कोणत्याही आई-वडिलांना आपली मुलं आयुष्यात यशस्वी होतायत हे पाहून आनंद होत असतो. ज्यांना लहानाचं मोठं केलं, तीच मुलं एकदिवस आयपीएस, आयएएस अधिकारी होतात हे पाहताना आई-वडिलांचा ऊर किती अभिमानानं भरून येत असेल याचा कधी तुम्ही विचार केलाय का? नुसत्या विचारानंच अंगावर काटा उभा राहिला ना? अशाच प्रकारे एका मुलानं UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं कळताच प्रथम आपल्या वडिलांना तो निकाल सांगण्याचा विचार केला आणि त्यानं थेट वडिलांचं ऑफिस गाठलं. जेवणावर बसलेल्या वडिलांना निकाल सांगताच ते उठले आणि त्यांनी मुलाला कडकडून मिठी मारली. या प्रसंगातील वडिलांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अगदी काळजाला भिडणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वडील आपल्या ऑफिसमध्ये जेवणाच्या वेळेत मित्रांसह बसून जेवत असतात. तेवढ्यात त्यांचा मुलगा त्यांना एक खास गोष्ट सांगण्यासाठी म्हणून तिथे पोहोचतो. त्याल पाहून वडीलही काही क्षण गोंधळात पडतात. त्यावेळी मुलगा त्यांना आपण यूपीएससी परीक्षा पास झाल्याची माहिती देतो. ते ऐकल्यावर वडील एकदम हर्षभरीत होतात आणि त्या आनंदातच ते जेवण सोडून मुलाचे घट्ट मिठी मारून अभिनंदन करतात. स्वाभाविकत: तेथे असलेले वडिलांचे मित्रदेखील त्याचे अभिनंदन करीत कौतुक करतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video sjr
First published on: 20-04-2024 at 16:12 IST