नव्या पद्धतीच्या कॉफी शॉपबरोबरच पिढय़ान्पिढय़ा तरुणाईचे अड्डे जमवणाऱ्या इराणी कॅफेमधली गर्दीही पावसाच्या साथीत वाढीला लागते.

पाऊस, रोड ट्रिप आणि गाणी-मस्ती.. असं रोमँटिक कॉम्बिनेशन घडत असतं तेव्हा त्याला कॉफी शॉपच्या ‘कोझी’ वातावरणाची जोड अधून मधून हवीच. कॉफी शॉपची संस्कृती आता आपल्याकडे चांगलीच स्थिरावली आहे. कॅफे कॉफी डे, बरिस्ता यांनी गेली दोन दशकं आपल्याला वाफाळती कॉफी आणि त्यासोबत गरमागरम बेक्ड आयटेम्स खायची सवय केली. आता तर फेमस ‘स्टारबक्स’ आपल्याकडे टाटांशी हातमिळवणी करीत आलंय. पण या आधुनिक कॉफी शॉपची चेन स्टोअर्स सुरू होण्यापूर्वीपासून शहरी तरुणाईला ‘कॅफे’बद्दल प्रेम आहे. कारण – इराणी कॅफे. भर चौकात ऐन मोक्याच्या ठिकाणी जुन्या इमारतीत वसलेलं छानसं इराणी कॅफे हे गेल्या अनेक पिढय़ांचा पॉप्युलर कॉलेज अड्डा आहे. अजूनही या जुन्या इराणी कॅफेंची लोकप्रियता कमी झालेली नाही. मुंबईच्या मेरवान, पुण्याच्या गुडलकसारख्या हॉटेलांमधून अजूनही तरुण तुर्काची गर्दी दिसतेच. या इराणी कॅफेच्या जोडीला आता नाक्या नाक्यावर आधुनिक अवतारात केक शॉप्सही दिसत आहेत. ही नवनवीन ठिकाणं सध्या पावसाळ्यात तरुण मंडळींमुळे भरलेली दिसतात. अशा कॅफे आणि केक शॉप्समध्ये पावसाळ्यासाठीच्या खास गरम पदार्थाची रेलचेल असते. नवनवीन चवी तिथे चाखायला मिळतात.

Solapur District, Unseasonal Rain, Winds, Damage, lightning, one girl and 2 animals died, Unseasonal Rain in Solapur, solapur unseasonal rain, damage crops, farmers, solapur news,
सोलापूर व ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे नुकसान
water supply through tankers
दुष्काळ ; ५,००० गावे टँकरग्रस्त
Nashik, Onion auction, Onion, Lasalgaon
नाशिक : लासलगाव बाजारात आठ दिवसांनंतर कांदा लिलाव पूर्ववत, सरासरी दीड हजार भाव
Mumbai temperature at 37 degrees
मुंबईचा पारा ३७ अंशावर

14पावसाळा सुरू झाला की तरुणाईला रोड ट्रिप्सचे वेध लागतात. अशा वेळी ‘हाय वे’वरच्या ‘मॅक डी’पासून ते अशा एखाद्या फेमस कॉफी शॉपपर्यंत कुठेही प्लॅनिंग ते एक्झिक्युशन मीटिंग्ज रंगतात. याविषयी बोलताना पुण्याची निकिता ननावरे म्हणाली, ‘‘आम्ही सगळी मित्र मंडळी पावसाळ्यात न चुकता रोड ट्रिपला जातो. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर आम्ही पावसाचा आनंद लुटण्यासाठी येतो. या वेळी कुलाब्यातील कॅफे मोंदेगारमध्ये आम्ही जाऊन आलो. तिथे चाखलेला ब्लू बेरी चीझ केक आणि सोबतीला पडणारा मुंबईचा तुफान पाऊस यांनी तृप्त होऊनच पुण्याच्या घरी परतलो.’’

मुंबईत इराणी कॅफेसोबत साऊथ इंडियन फिल्टर कॉफीचा अस्सल स्वाद देऊ करणारी उडपी रेस्टॉरंट्सही आहेत. माटुंग्याचे ‘डीपी’ज, मणीज लंच होम, मद्रास कॅफे, कॅफे कुलार, कॅफे कॉलनी अशी मुंबईतील काही जुनी रेस्टॉरंट्स तिथल्या कडक कॉफीसाठी प्रसिद्ध आहेत. इथेही कॉलेज तरुणाईचे अड्डे जमलेले दिसतात. या कॅफेजमध्ये कॉफी बरोबरीनेच जिंगर टी, ब्लॅक टी, ग्रीन टी असे चहाचेही प्रकार बघायला मिळतात. ही झाली जुणी-जाणती मंडळी. आता त्याचबरोबर होम शेफ, कॅफे ग्रँडमाज, लव्ह अ‍ॅण्ड लाते, कॅफे अ‍ॅमिगोज असे काही नवीन स्वरूपाचे कॅफेसुद्धा तरुणाईचे आवडीचे कट्टे ठरले आहेत. या कॅफेजचं इंटीरियर बघून ते अनुभवण्यासाठीही तरुण मंडळी तिथे हमखास हजेरी लावतात. पदार्थ चाखणे ही बाब यावेळी काहीशी दुय्यम होऊन जाते. सध्या अशा नवीन कॅफेमध्येही ‘व्हिंटेज इंटीरियर’ चलतीत आहे. तसं नसेल तर ग्लास इंटेरियर, लॅव्हिश सोफा सेट्स, नक्षीकाम केलेली डायनिंग टेबल अशा कॉफी शॉपला रोमँटिक बनवतात. डोळ्याला सुखावणाऱ्या रंगाचा सोफा आणि पुढय़ात असलेलं ग्लास टेबल, पाश्र्वभूमीला मूड तयार करणारं मंद संगीत, कॉफी शॉपच्या खिडकीतून ओघळणारा पाऊस आणि हातात एक कप कॉफीचा वाफाळता कप.. याच त्या वातावरणासाठी एकटे- दुकटे, कपल्स किंवा मोठा ग्रूप. सगळे जण कॉफी शॉपचा रस्ता धरतात. ल्ल

15चहा झाला हायफाय
चहा आणि कॉफी दोन्हीचे कट्टर प्रेमी आपापली पेयं कशी श्रेष्ठ हे सांगत असतात. आपल्याकडे कॉफीपेक्षा चहा हेच सर्वसामान्य पेय. भारतात कुठेही जा (काही दक्षिण भारतीय शहरांचा अपवाद वगळता) रस्त्यावरच्या टपरीवर ‘चाय’ मिळणारच. कनिष्ठ वर्ग, मध्यम वर्ग आणि उच्च वर्ग यांच्यातील दरी भरून काढणारं पेय म्हणजे चहा. कोणाच्याही घरी गेलं की चहा मिळणारच. संस्थानिकांच्या काळापासूनच चहाचं प्रस्थ मोठं आहे. मोठमोठय़ा कॉन्फरन्सेस किंवा मीटिंग्जमध्येसुद्धा चहाच देण्याची पद्धत असते. त्या वेळी ब्लॅक टी सव्‍‌र्ह केला जातो. आपल्या आवडीनुसार शुगर क्युब्स आणि दूध घालून हळू हळू ते विरघळवत एक एक सिप घ्यायचा असतो. खरं तर पाश्चिमात्य परंपरेत चहा पहिल्यापासूनच हायफाय होता. अजूनही कॉर्पोरेट मीटिंग्जमध्ये ‘हाय टी’ या नावाखालीच उच्चभ्रूंची संध्याकाळची पार्टी होते. याउलट अगदी सगळ्यांच्या खिशाला सहज परवडेल असा टपऱ्यांवरचा चहा. प्रत्येक कॉलेजबाहेर हमखास अशा टपऱ्या बघायला मिळतात. कॉफीला मात्र आलिशान कॉफी शॉप शोधावं लागतं. कॉफी शॉपची संस्कृती भारतात स्थिरावून आता दोन दशकं व्हायला आली. कॅफे कॉफी डे, बरिस्ता यांनी लावलेलं वेड आता ‘स्टारबक्स’सारख्या ‘मल्टिनॅशनल’मुळे चांगलंच विस्तारतंय. त्या मानाने चहानं अद्याप टपरीची साथ सोडली नसल्याचं दिसतं. तरीही सध्या मोठय़ा शहरात दिसणाऱ्या टी बुटिक, टी हाउस यामुळे वेगवेगळ्या, महागडय़ा चहाची अस्सल चव चाखायला मिळतेय.

– प्राची परांजपे