फोर्ब्सने भारतीय अब्जाधीशांची यादी जाहीर केली असून त्यात २५ नवीन व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. अब्जाधीशांच्या यादीत नव्याने एंट्री करणाऱ्या श्रीमंत लोकांमध्ये रेणुका जगतियानी यांचाही समावेश आहे. देशातील श्रीमंतांच्या यादीत रेणुका जगतियानी ४४व्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती सुमारे ५ अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज आहे. आज रेणुका अब्जाधीशांच्या यादीत सामील आहे, तर एक काळ असा होता जेव्हा तिचा नवरा लंडनच्या रस्त्यावर कॅब चालवत असे. फोर्ब्सच्या भारतीय अब्जाधीशांच्या यादीत नुकतेच समावेश झालेल्या या अब्जाधीशांबद्दल जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोण आहे रेणुका जगतियानी?

रेणुका जगतियानी या लँडमार्क ग्रुपच्या सीईओ आहेत आणि लँडमार्क ग्रुपचा व्यवसाय अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. याचे मुख्यालय दुबईमध्ये आहे आणि या कंपनीची स्थापना रेणुका यांनी त्यांचे दिवंगत पती मिकी जगतियानी यांच्यासह केली होती.

लँडमार्क ग्रुपच्या सीईओकडे इतकी संपत्ती आहे
फोर्बच्या टॉप १०० भारतीय श्रीमंतांच्या यादीत रेणुका जगतियानी ४४व्या स्थानावर आहे. रेणुका जगतियानी यांची संपत्ती $४.८ बिलियन किंवा सुमारे ४०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.

फोर्ब्स२०२४ च्या श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट असलेल्या रेणुका जगतियानी यांनी लँडमार्क ग्रुपला यशाच्या शिखरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. व्यवसाय क्षेत्रातील तिच्या कामाची दखल घेत रेणुका यांना २००७ मध्ये उत्कृष्ट एशियन बिझनेस वुमन ऑफ द इयर आणि २०१२ मध्ये बिझनेसवुमन ऑफ द इयर सारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आज श्रीमंतांच्या यादीत वर्चस्व गाजवणाऱ्या रेणुका जगतियानीची कहाणी खूप रंजक आहे.

पती लंडनच्या रस्त्यावर कॅब चालवायचा

आज रेणुका भलेही भारतीय श्रीमंतांच्या यादीत उच्च स्थानावर पोहोचली असेल, पण तिने तिच्या आयुष्यात अनेक मोठे चढउतार पाहिले आहेत.. रेणुका यांचे पती दिवंगत मिकी जगतियानी एकेकाळी रस्त्यावर कॅब चालवून आपला उदरनिर्वाह करत होते यावरून याचा अंदाज लावता येतो. रिपोर्ट्सनुसार, मिकी १९७० च्या दशकात लंडनमध्ये कॅब ड्रायव्हर होते आणि तेथून ते प्रथम बहरीन आणि नंतर दुबईला गेले आणि त्यानी एक प्रचंड व्यवसाय साम्राज्य निर्माण केले, ज्याचे व्यवस्थापन पत्नी रेणुका जगतियानी करत आहेत.

मिकी जगतियानी, ज्या लंडनमध्ये कॅब सेवा पुरवत असे, १९७३मध्ये त्याचे आई-वडील आणि भावाच्या आकस्मिक निधनानंतर बहरीनला गेल्या, जिथे त्यानी आपल्या भावाचे खेळण्यांचे दुकान सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांनी जवळपास एक दशक मुलांसाठी खेळण्यांचे दुकान चालवले आणि एक कुटुंबांला आधार दिला. दरम्यानच्या काळात त्यांनी त्यांच्या खेळण्यांचे आऊटलेट्स देखील वाढवले आणि १० वर्षांत ६ खेळण्यांची दुकाने सुरू केली. यानंतर, आखाती युद्ध संपल्यानंतर, त्या दुबईला पोहोचल्या आणि तिथे त्याचा लँडमार्क ग्रुप सुरू केला.

हेही वाचा – प्रत्येकी १० पैकी एका महिलेचं आयुष्य अत्यंत गरिबीत, युएन वुमेनच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

पतीच्या निधनानंतर व्यवसाय हाती घेतला


लँडमार्क ग्रुपच्या माध्यमातून मिकी जगतियानी यांनी मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर आणि हॉटेल व्यवसायात आपला व्यवसाय वाढवला. पतीच्या निधनानंतर, रेणुका जगतियानी यांनी व्यवसाय हाती घेतला आणि १९९३ मध्ये त्यांनी लँडमार्क ग्रुपमध्ये प्रवेश केला. तीन मुलांची आई रेणुका यांना वारसाहक्काने $४.८ अब्ज संपत्ती मिळाली आहे. आता रेणुका जगतियानी या समूहाच्या अध्यक्षा असून आरती, निशा आणि राहुल या तिन्ही मुलांचा संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा – घरात मशरुमची लागवड करून दिवसाला २००० रुपये कमावतेय ही महिला उद्योजक

लँडमार्कचा व्यवसाय २१ देशांमध्ये पसरला आहे

रेणुका यांनी लँडमार्क ग्रुपचा ताबा घेतल्यानंतर, त्यांनी आपल्या व्यवसायाचा झपाट्याने विस्तार केला आणि आज जगातील २१ देशांमध्ये कंपनीची २२०० हून अधिक स्टोअर कार्यरत आहेत. दुबईत पतीकडून मिळालेला व्यवसाय भारतात पुढे नेण्यातही रेणुका यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. फोर्ब्सच्या मते, त्यांनी १९९९मध्ये लँडमार्क ग्रुपचा भारतीय व्यवसाय सुरू केला आणि आता कंपनीची देशात ९०० हून अधिक स्टोअर्स आहेत. याचसह लँडमार्क ग्रुपचा हॉटेल व्यवसायही वेगाने प्रगती करत असून रेणुका यांच्या संपत्तीतही त्याच वेगाने वाढ होत आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is landmark group ceo renuka jagtiani forbes newest edition to the elite billionaire club indias newest billionaire snk
Show comments