‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या २ ते ६ जून दरम्यान मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. बांधवगड हे ऐतिहासिक काळापासून राजघराण्याचे राखलेले जंगल आहे. परंतु या राजेशाहीच्या काळातच झालेल्या मोठय़ा शिकारीनंतर महाराज मरतडसिंह यांनी शिकारीवर बंदी घातली. या जंगलाचे एका राखीव वनामध्ये रूपांतर केले. वन्यप्राण्यांना संरक्षण दिले, त्यांच्यासाठी जागोजागी लहानमोठे बांध घातले. हे संपन्न जंगल पुढे १९७५ साली व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाले. एकूण ४४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचीही इथे नोंद झाली आहे. अशा या जंगलात हत्ती आणि जीपमधून हे प्राणी दाखवण्याची सोय आहे. या सहलीमध्ये बांधवगडच्या जोडीनेच जबलपूरमधील भेडा घाटलाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

राजगड मोहीम
‘झेप’ संस्थेतर्फे येत्या २६ एप्रिल रोजी राजगड
किल्ल्यावर पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे.  
छत्रपती शिवरायांची पहिली राजधानी आणि असंख्य ऐतिहासिक वास्तूंसाठी राजगड प्रसिद्ध आहे. अधिक माहितीसाठी अमेय जोशी (९८२३४३०३३२) यांच्याशी संपर्क साधावा.

ताडोबा जंगल भ्रमंती
‘वाइल्ड डेस्टिनेशन’तर्फे २६ ते २९ जून  दरम्यान ताडोबा जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी, तसेच २५० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमित भुस्कुटे (९८१९२१५१२७) यांच्याशी संपर्क साधावा.

पक्षी निरीक्षण सहल
‘निसर्ग सोबती’तर्फे येत्या १४ ते १७ मे दरम्यान पानगोट आणि सातताल परिसरात पक्षी निरीक्षण अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. पानगोट आणि सातताल ही पक्षिस्थळे उत्तराखंडमधील नैनीतालपासून १५ ते ३० किलोमीटर अंतरावर आहेत. या दोन्हीही ठिकाणी ४०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. या पक्ष्यांचे अभ्यासकांच्या मदतीने निरीक्षण आणि छायाचित्रण करण्याची या सहलीमध्ये संधी आहे. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.