मागील  अभ्यास वर्गामध्ये आपण विरामभंग म्हणजे (Breakouts) व  तेजीवाले व मंदीवाल्यांचे सापळे (Traps) इत्यादींचा अभ्यास केला.
सदर अभ्यासवर्गातील मुद्दे आपण तक्त्याद्वारे समजून घेवूया. तांत्रिक विश्लेषणाला मर्यादा आहेत हे आपण मागील अभ्यास वर्गामध्ये समजून घेतले तांत्रिक विश्लेषणाचा सर्वात मोठा नकारात्मक मुद्दा म्हणजे विश्लेषणाचा कालावधी म्हणजे (Time Frame) होय.
त्यामुळे तांत्रिक विश्लेषण हे अचूक आहे असे समजू नये. शेअर्सच्या किंवा निर्देशांकच्या किंमतीने २०० डी एम ऐ ला खालून वरच्या दिशेने छेद दिला असता गोल्ड (Gold) क्रॉस ओव्हर झाले म्हणजे मोठय़ा प्रमाणात तेजी येईल व ती कित्येक दिवस टिकेल असा भ्रम बाजारात पसरलेला आहे तसेच शेअर्सच्या किंवा निर्देशांकच्या किंमतीने २०० डी एम ऐ ला वरून खालच्या दिशेने छेद दिला असता ब्लाक (Black) क्रॉस ओव्हर झाले म्हणजे मोठय़ा प्रमाणात मंदी येईल व ती कित्येक दिवस टिकेल असे मत बाजारात पसरलेले आहे व दूचचित्रवाणीवरील वाहिन्यावरून दिग्गज बाजारतज्ज्ञ तसे मत मांडतात; परंतु हा भ्रम आहे हे खालील तक्त्यावरून समजेल.
ऐतिहसिक उच्च पातळी तोडून शेअर्सवर गेला म्हणजे विरामभंग झाला जो सामान्य लोकांचा अतिशय आवडता खरेदी िबदू आहे; परंतु हा सापळा असू शकतो हे खालील तक्त्यानुसार आपणास समजू शकेल त्यामुळेच वाचकांनी कोणत्याही पद्धतीने खरेदी विक्री करावी पण धोकारोधक (Stop Loss) जरूर लावावा.
वरील दोन्ही उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की या गोष्टीचा वापर करून तेजीवाले व मंदीवाले सापळा रचतात व सामान्य गुंतवणूकदारांना त्या सापळयांना बळी पडतात.
av-04 av-05
info@primetechnicals.com