कोकणात आजही अनेकांच्या गजाली (गप्पा)मध्ये भुता-खेतांच्या गोष्टी सर्वाधिक चच्रेत असतात. कुणाकडून ऐकलेल्या, पूर्वापार चालत आलेल्या समज-गरसमजांवर या गोष्टी आधारलेल्या असतात. या सर्वात एक समान धागा असतो तो म्हणजे रात्रीचा. विश्वास आणि अविश्वास यांच्या पुसटशा सीमारेषेवर या गोष्टी आधारित असतात. अशाच काही ऐकीव, काल्पनिक गोष्टींवर ‘रात्रीस खेळ चाले’ या नव्या मालिकेची कथा आधारलेली आहे.

कोकणातल्या नाईक कुटुंबाची कथा मालिकेत सादर करण्यात आली आहे. या कुटुंबात चार भावंडे. यापकी माधव आणि त्याची बायको नीलिमा नोकरीनिमित्ताने शहरात स्थायिक झालेली असतात. गावी बऱ्याच दिवसांनतर घरात एक शुभ कार्य होणार असल्याने माधव आपल्या कुटुंबासह कोकणात घरी येतो. गावी पोहोचल्यानंतर एकामागोमाग एक अताíकक घटनांची मालिका सुरू होते. माधवची बायको नीलिमा शास्त्रज्ञ असल्याने ती या सर्व घटनांमागचे गूढ शोधण्याचा निर्णय घेते, ती तो कशा पद्धतीने घेते हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

मालिकेतील बहुतेक सर्वच कलाकार नवीन असले तरी विविध नाटकांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेले आहे. कोकणचा परिसर, तेथील जुन्या पद्धतीचे कौलारू घर, त्याबाहेरील मोठे अंगण, वड-पिपंळाचे झाड, त्याखालची विहीर यांचेही या मालिकेत महत्त्वाचे स्थान आहे. मालिकेचे संपूर्ण चित्रीकरण कोकणातील एका गावात होत आहे. मालिकेची कथा आणि पटकथा संतोष अयाचित आणि आशुतोष पराडकर यांची आहे तर संवाद प्रल्हाद कुडतरकर यांचे आहेत. ‘साजरी क्रिएटिव्हज’ची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन राजू सावंत यांनी केलं आहे.

भास आणि आभासांच्या रंजक खेळाची ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका येत्या २२ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार या दिवशी रात्री साडेदहा वाजता ‘झी मराठी’वरून प्रसारित होणार आहे.