अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांचा इस्त्रायल दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. विमानतळावर मेलानिया यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा हात पकडण्यास नकार देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर अनेकांनी डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.

पहिल्या परदेश दौऱ्यावर निघालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नीसह सोमवारी सौदी अरेबियातून इस्त्रायलमध्ये पोहोचले. दोन्ही देशांमधील राष्ट्रप्रमुखांमध्ये अधिकृत बैठक होण्यापूर्वीच ट्रम्प यांचा हा दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर इस्त्रायलच्या तेल अव्हीवमधील विमानतळावरील डोनाल्ड ट्रम्प यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू हे त्यांच्या पत्नीसह ट्रम्प दाम्पत्याच्या स्वागतासाठी विमानतळावर आले होते. विमानतळावरुन बाहेर पडत असताना नेतान्याहू त्यांच्या पत्नीचा हात पकडून चालत होते. डोनाल्ड ट्रम्पदेखील मेलानिया यांचा हात पकडायला गेला. पण मेलानिया यांनी ट्रम्प यांचा हात झटकला आणि ट्रम्प यांचा हात न पकडताच त्या पुढे गेल्या. हा सर्व प्रकार नेटिझन्सच्या नजरेतून सुटला नाही. त्यांनी या व्हिडीओवरुन डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.

pune covishield vaccine marathi news, risk of covishield vaccine marathi news
कोव्हिशिल्ड लशीमुळे धोका किती? कोविड कृती दलाचे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकरांनी दिलं उत्तर…
Mallikarjun Kharge interview Congress loksabha elections 2024 PM Narendra Modi BJP
इंडिया आघाडी जिंकली तर नेतृत्व कोण करणार? मल्लिकार्जुन खरगेंनी केला खुलासा
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
Uddhav Thackeray Train Travel
उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा बोईसर ते वांद्रे ट्रेनने प्रवास, फोटो आणि व्हिडीओ चर्चेत

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांच्यातील संबंध बिघडले आहेत की काय असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होत आहे. गेल्या महिन्यात एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी डोनाल्ड ट्रम्प मेलानिया यांच्याकडे पाहात असताना त्या स्मितहास्य करत आहेत आणि अचानक ट्रम्प यांनी पुढे पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव एका व्हिडीओत अचूकपणे टिपले गेले होते. आपले ट्विटर हॅंडल न वापरणाऱ्या मेलानिया यांनीदेखील या ट्विटला लाईक केले होते. त्यामुळे ट्रम्प दाम्पत्यामध्ये कुरबूर सुरु असल्याची चर्चादेखील रंगली होती.