scorecardresearch

हेलिकॉप्टर अपघात Photos

गेल्या वर्षांमध्ये महाराष्ट्रसह भारतामध्ये हेलिकॉप्टर अपघातांचे (Helicopter Crash) प्रमाण वाढले आहे. २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता, पुढे काही महिन्यांनंतर २०१८ मध्ये पुन्हा अशीच एक घटना घडली होती. त्याआधी २००९ मध्ये आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री वाय.एस.राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर अपघातांमध्ये निधन झाले होते.

८ डिसेंबर २०२१ रोजी भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांचाही अशाच एका हेलिकॉप्टर अपघातांत मृत्यू झाला होता. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) आणि फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (FAA) द्वारे संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये ९४ नागरी हेलिकॉप्टर अपघात झाले, त्यापैकी १९ अपघातांमध्ये ३५ जणांना जीव गमवावा लागला. यामध्ये सैन्य दलातील हेलिकॉप्टर अपघाताचा समावेश नसून ही एकूण संख्या २०२२ पर्यंत वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.Read More