scorecardresearch

About Videos

लता मंगेशकर Videos

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर शहरात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर शास्त्रीय गायक (Singer) होते. गायनासह ते संगीत नाटकांमध्ये काम देखील करत असतं. गायनाचा सूर त्यांच्याकडून लता यांच्यापर्यंत पोहोचला. वडिलांच्या निधनांनंतर आईची आणि चार लहान भावंडांची जबाबदारी लता यांच्यावर पडली. कुटूंबाचा भार उचलण्यासाठी त्यांनी फार लहान वयामध्ये गायनाला सुरुवात केली. घरामध्ये सर्वात मोठ्या असल्यामुळे घरामध्ये त्यांना दीदी म्हणत असतं. पुढे त्यांना सर्वजण लतादीदी म्हणू लागले. आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची भावंडं आहेत. भारताची गानकोकिळा अशी ओळख असलेल्या लतादीदींनी आजवर ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेली अजरामर गाणी आजही ऐकली जातात. दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण यांसारख्या असंख्य पुरस्कारांवर त्यांचे नाव कोरले आहे. २००१ साली त्यांनी भारतरत्न या सर्वाेच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२०२२ मध्ये करोना काळामध्ये त्यांना या आजाराची लागण झाली. उपचार सुरु असताना त्यांचे अवयव हळूहळू निकामी होत गेले. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.
Read More

ताज्या बातम्या

मराठी कथा ×