scorecardresearch

महाराष्ट्र पॉलिटिक्स Videos

महाराष्ट्र राज्यांमध्ये सध्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन वंचित आघाडी, एमआयएम, रिपाई असे काही पक्ष सक्रिय आहेत. काही ठिकाणी शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षांचे वर्चस्व आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यामध्ये बऱ्याच वर्षांसाठी कॉंग्रेसचे वर्चस्व होते.

काही कालावधीनंतर कॉंग्रेसची विचारसरणी नाकारणारा गट निर्माण झाला. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निर्माण झाला. जनता दलाच्या सदस्यांद्वारे भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. याच सुमारास हिंदूत्त्ववादी विचारसरणी असलेला शिवसेना पक्ष देखील उदयास आला. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातील राजकारणामध्ये कॉंग्रेसला असणारे बहुमत १९९० नंतर हळूहळू इतर पक्षांकडे झुकत गेले. २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये कॉंग्रेसचा तगडा पराभव झाला. त्यानंतर भाजपचे अच्छे दिन आले. २०१४ प्रमाणे २०१९ मध्येही या पक्षाला सर्वाधिक मत मिळाली. सत्तासंघर्षातून पुढे शिवसेना आणि भाजपमध्ये असलेली युती संपुष्टात आली. यातून महाविकास आघाडीचा उदय झाला. त्यांचे सरकार अडीच वर्ष टिकले. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष गमवावा लागला. दरम्यान बहुमत मिळवत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.

शिंदेच्या आधी शरद पवार, नारायण राणे, छगन भुजबळ अशा अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला राजीनामा देत बंड पुकारले होते. महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा इतिहास असला, तरी भविष्यामध्ये राज्याच्या राजकारणाला कोणते नवे वळण लागू शकते याबाबत कोणालाही भाष्य करता येणार नाही.
Read More
Voting in five phases how will the grand alliance benefit for the campaign loksabha election 2024
Five Phase Election in Maharashtra: पाच टप्प्यांत मतदान, महायुतीला प्रचारासाठी कसा होणार फायदा?

निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहे. त्यामुळे महायुतीला प्रचारासाठी अधिक राजकीय लाभ होण्याची शक्यता आहे.…

CAA issue and Amit Shahs challenge to uddhav thackeray
Amit Shah on Uddhav Thackeray: “ठाकरेंनी महाराष्ट्राला सांगावं…”, सीएएचा मुद्दा अन् शाहंचं आव्हान

CAA म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा मागे घेतला जाणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. संसदेने मंजुरी…

Brother Helicopter Ride
Brother Helicopter Ride: उपसरपंच भावासाठी हेलिकॉप्टरने गावाला प्रदक्षिणा, बंधू प्रेमाची होतेय चर्चा

मोठा भाऊ उपसरपंच होताच धाकट्या भावाने चक्क हेलिकॉप्टरने गावाला प्रदक्षिणा घातली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी साहेबराव खिलारे हे…

Datta Dalvi Granted Bail
Datta Dalvi Granted Bail: “हा सत्तेचा माज आहे”; जामीन मिळाल्यानंतर दत्ता दळवी काय म्हणाले? |Shivsena

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांची जामीनावर सुटका झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल भाषणात आक्षेपार्ह…

ताज्या बातम्या