scorecardresearch

नागालँड विधानसभा निवडणूक २०२३ News

नागालँड या ईशान्येकडील राज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभेच्या ६० जागांसाठी निवडणुकांचे आयोजन करण्यात आले होते. मतदानानंतर लवकरच मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली गेली. या निवडणुकांचे निकाल २ मार्च २०२३ रोजी जाहीर केले जाणार आहे. १२ मार्च २०२३ रोजी १३ व्या नागालँड विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये एनडीपीपी आणि भाजपा या पक्षांच्या उमेदवारांनी बहुतांश जागा जिंकल्या. पुढे त्यांनी युती करत सरकार देखील स्थापन केले. त्यानंतर नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे नेफिऊ रिओ मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्येही एनडीपीपी आणि भाजपा यांना बहुमत मिळणार असून ते मिळून पुन्हा सत्तास्थापना करणार असल्याचे संकेत आहेत.

नागालँड विधानसभा निवडणुकांमध्ये (Nagaland Assembly Election 2023) भाजपाने २० तर एनडीपीपीने ४० जागा लढवल्या होत्या. इंडिया टुडेच्या चाचणीत एनडीपीपीला २८ ते ३४ तर भाजपला १० ते १४ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामानाने इतर पक्ष सहा ते सात जागा जिंकू शकतील असे म्हटले जात आहे.

२ मार्च २०२३ रोजी मतमोजणी पूर्ण करुन निकाल घोषित झाले. भाजपाला आपल्या जोडीदार पक्षांसह सत्ता राखण्यात यश मिळाले.
Read More
Nagaland zero percent voting
नागालँडमधील सहा जिल्ह्यांत शून्य टक्के मतदान; दिवसभर मतदान केंद्र ओस पडल्याचे चित्र; नेमकं काय घडलं?

नागालँडमध्ये एक वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली आहे. नागालँडमधील सहा जिल्ह्यांमध्ये शून्य टक्के मतदान झाले. येथील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

sharad pawar
नागालँडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपाप्रणित सरकारला पाठिंबा; व्यापक हितासाठी निर्णय!

नागालँडमध्ये विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीत एनडीपीपी पक्षाचा २५, तर भाजपाचा १२ जागांवर विजय झाला आहे. या…

amit shah and narendra modi and j p nadda
भाजपाची तिन्ही राज्यांत चांगली कामगिरी, जनाधार मात्र घटला! नागालँड, त्रिपुरा, मेघालयच्या निकालाचा अर्थ काय?

ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय, नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

girish kuber on election
Video: ईशान्य भारतात पुन्हा भाजपाची सत्ता, निवडणूक निकालाचा अन्वयार्थ काय? जाणून घ्या गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

देशाच्या राजकारणासाठी ईशान्य भारतातील तिन्ही राज्यांच्या निवडणूक निकालाचा नेमका अर्थ काय आहे, यावर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण…

tripura nagaland Meghalaya elections exit polls
Exit Polls: त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपा सत्ता राखेल; मेघालयमध्ये त्रिशंकू अवस्था

Tripura, Nagaland, Meghalaya Assembly Election Exit Polls : ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय राज्यातील निवडणुकांचे मतदानोत्तर चाचणीच्या (एक्झिट पोल)…

tripura election
मेघालय-त्रिपुरात त्रिशंकू, नागालँडमध्ये ‘एनडीए’, विधानसभा निवडणुकीतील मतदानोत्तर चाचणीचा अंदाज

मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडल्यानंतर या दोन राज्यांसह त्रिपुरातील मतदानोत्तर चाचणीचे (एक्झिट पोल) अंदाज हाती आले आहेत.

ईशान्येची राज्ये भाजपची अष्टलक्ष्मी – मोदी; काँग्रेसने ‘एटीएम’सारखा वापर केल्याचा आरोप

मोदींनी दावा केला, की भाजपने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून भ्रष्टाचाराला मोठा आळा घातला आहे.