scorecardresearch

विश्वचषक २०२३ Photos

आयसीसी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउंन्सिल (ICC) या जागतिक स्तरावरील संघटनेद्वारे दर चार वर्षांनी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे (Worlc Cup)आयोजन केले जाते. विश्वचषक स्पर्धेची सुरुवात १९७५ मध्ये झाली. पहिली विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये पार पडली. तेव्हा इंग्लंड व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका असे देश या स्पर्धेत सामील झाले होते. त्यावेळी पहिला विश्वचषक वेस्ट इंडिजच्या संघाने जिंकला. तेव्हापासून आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने ५ वेळा. वेस्ट इंडिज आणि भारताने २ वेळा आणि इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका या देशांनी एकदा विश्वचषक जिंकला आहे.


 


१९७५ पासून ते २०२३ पर्यंत या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेमध्ये अनेक बदल झाले आहेत. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये ही स्पर्धा ६० षटकांची होती. तेव्हा कसोटी सामन्याप्रमाणे खेळाडू हे पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करत असत. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठीही विशिष्ट नियम होते. या सर्व गोष्टी कालानुरुप बदलत गेल्या आहेत. ही एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आता ५० षटकांची झाली आहे. प्रत्येक संघाची जर्सी आहे, त्यातही ठराविक रंगाचा समावेश आहे. पहिल्या दोन-तीन विश्वचषक स्पर्धांच्या हंगामामध्ये क्रिकेट विश्वावर वर्चस्व असणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला २०२३च्या विश्वचषकामध्ये सहभागी होता आले नाही. तर नेदरलॅंड्स, बांगलादेश सारख्या देशांच्या क्रिकेटच्या संघाने चांगली कामगिरी करत या स्पर्धेपर्यंत मजल मारली. 


 


सध्या भारतामध्ये विश्वचषक २०२३ सुरु आहे. भारतातल्या विविध स्टेडियम्समध्ये ५ ऑक्टोबरपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जात आहेत. स्पर्धेदरम्यान एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत- ज्यामध्ये उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीतल्या सामन्याचाही समावेश आहे. संपूर्ण जगातील क्रिकेटवेडे चाहते या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. भारताकडे विश्वचषकाचे यजमानपद असल्याने देशात धामधूम आहे. २०११ प्रमाणे यंदाही यजमान विजेतेपद मिळवणार अशी अपेक्षा भारतीय चाहत्यांना आहे.


Read More
ind vs aus
11 Photos
भारताचा स्वप्नभंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यातील ‘या’ पाच चुका जिथे सामना हातून निसटला

विश्वचषक २०२३ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून भारताचा पराभव केला आहे.

Team India reached Pune before the match against Bangladesh got a warm welcome at the airport
12 Photos
Team India: टीम इंडिया पुण्यनगरीत! बांगलादेशला चीत करण्यासाठी रोहित सेना सज्ज, विमानतळावर जल्लोषात स्वागत

World Cup 2023, Team India: पाकिस्तानला चारीमुंड्या चीत करून पुढील सामना खेळण्यासाठी टीम इंडिया पुण्यात पोहोचली आहे. पुण्यानगरीतील विमानतळावर भारतीय…

ODI World Cup 2023: Get set ready to go is starting for the World Cup note down the latest squads of all 10 teams
12 Photos
ICC World Cup 2023 squad: १५० खेळाडू, १० संघ, ४४ दिवस; विश्वचषकाच्या महाकुंभमेळ्याला सुरुवात, कोणाला मिळाली संधी? जाणून घ्या

ICC World Cup 2023 squad: वर्ल्ड कप २०२३ ला ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. या स्पर्धेत १० संघ सहभागी…

ODI World Cup Trophy 2023 reaches Pune grand procession from Senapati Bapat Road Crowd of Pune residents to see the trophy
9 Photos
World Cup 2023 Pune: ढोल ताशांच्या गजरात ‘विश्वचषक ट्रॉफी’ पुण्यात पोहोचली, सेनापती बापट रोडवरुन भव्य मिरवणूक; चाहत्यांची अलोट गर्दी

ODI World Cup 2023 Pune: वन डे आयसीसी विश्वचषक २०२३ स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तब्बल २७ वर्षांनंतर पुण्यात…

The history of Team India's jersey in the World Cup the colors and designs have been changing for 31 years
9 Photos
Team India World Cup Jersey: विश्वचषकात टीम इंडियाच्या जर्सीचा इतिहास, ३१ वर्षात किती रंग आणि डिझाइन बदलले? जाणून घ्या

Indian Cricket Team Jersey: भारतीय क्रिकेट संघाची जर्सी आयसीसी विश्वचषक २०२३ सुरू होण्याच्या दोन आठवडे आधी लाँच करण्यात आली होती.…

ODI WC: See how India performed in every World Cup from 1975 to 2019 missed in 2003 won in 1983-2011
12 Photos
ICC WC Winners List: १९७५ ते २०१९ कसा होता विश्वचषक ट्रॉफीचा प्रवास? कोणत्या संघाने किती वेळा जिंकला वर्ल्डकप? जाणून घ्या

ICC ODI World Cup Winners List: आयसीसी विश्वचषक २०२३ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी विश्वचषक…

ICC launched ODI World Cup 2023 logo on 12th anniversary of India’s 2011 title win known as Navarasa shows nine emotions
9 Photos
ICC WC 2011: एक तप पूर्ण! २०११च्या विजेतेपदाच्या आठवणींना उजाळा, ICCचा ‘नवरस’ पूर्ण लोगो प्रदर्शित

२०११ साली भारताने विश्वचषक जिंकला होता. आज त्याला १२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त ICCने WC२०२३ चा लोगो जाहीर केला.

IND vs SL ODI: Strong move from Team India ahead of World Cup 2023 sheer success against Sri Lanka
9 Photos
IND vs SL ODI: विश्वचषक २०२३च्या दृष्टीने टीम इंडियाचे दमदार पाऊल, श्रीलंकेविरुद्ध मिळवले निर्भेळ यश

भारत-श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-० असे निर्भेळ यश संपादन करत विश्वचषक २०२३च्या दृष्टीने एक यशस्वी पाऊल पुढे…

T20 World Cup: Know the best players to hit the highest sixes in T20 World Cup 2022
9 Photos
T20 World Cup: टी२० विश्वचषक २०२२ मध्ये सर्वाधिक उंच षटकार मारणारे सर्वोतम खेळाडू, जाणून घ्या

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या टी२० विश्वचषक २०२२ सुरु असून त्यात चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळत आहे. त्यातील सर्वाधिक उंच षटकार मारणारे…

PHOTO: India's highest run-scorers in T20 World Cup
9 Photos
PHOTO: सर्वाधिक धावा करणारे टी२० विश्वचषकातील भारतीय खेळाडू, जाणून घ्या

आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ सज्ज झाला असून काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. २००७ पासून ते २०२१ पर्यंतच्या विश्वचषकात…

ताज्या बातम्या