चाकण प्रकल्पातून नव्या ‘कॉम्पॅक्ट सेडान’चे उत्पादन
भारतासाठी विशेष रुपाने डिझाईन आणि उत्पादित करण्यात येणाऱ्या नवीन कॉम्पॅक्ट सेडानमध्ये गुंतवणूक करून फोक्सवॅगन उत्पादन श्रेणीत भर घालत आहे. या कॉम्पॅक्ट सेडानचे उत्पादन कंपनीच्या पुण्यानजीकच्या चाकण प्रकल्पात २०१६ च्या पूर्वार्धात सुरू होणार असून याकरिता ७२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. युरो चलनात ही रक्कम ८५ दशलक्ष आहे.
भारतात दीर्घकालीन गुंतवणूकीची योजना आखली असून सातत्याने वाढत्या ऑटोमोटिव्ह बाजारपेठे विषयी आत्मविश्वास असण्याचे हे द्योतक आहे, अशा शब्दात फोक्सवॅगन इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. अॅन्ड्रेयास लॉरमन यांनी विस्तार योजना जाहीर केली. तर फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे संचालक मायकल मायर यांनी यानिमित्ताने सांगितले की, नवीन कॉम्पॅक्ट सेडानमुळे भारतातील ग्राहकांच्या विशेष गरजांवर लक्ष केंद्रित करणे आम्हाला सुलभ होईल.
फोक्सवॅगनतर्फे २०१४ च्या सुरुवातीला १,५०० कोटी रुपयांच्या (अंदाजे १७६ दशलक्ष युरो) गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली होती. चाकण प्रकल्प हा नवीन वाहनांकरिता तयार होत असून सध्याच्या उत्पादन केंद्रात नवीन उपकरणे जोडणे तसेच जुन्यातही बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये होणाऱ्या वाहन मेळ्यात नवे वाहन सादर करण्यात येईल.
* फोक्सवॅगनची विशेष वाहनांकरिता अधिक गुंतवणूक करून भारताविषयी कटिबध्दता
* नवीन कॉम्पॅक्ट सेडानचे उत्पादन पुण्यातील चाकण येथे करणार; त्यासाठी ७२० कोटी रुपयांची गुंतवणूक
* भारताकरिता दीर्घकालीन गुंतवणूक योजना व बाजारपेठेतील हिस्सा वाढीचे लक्ष्य