fund* संजय चावला, मुख्य गुंतवणूक अधिकारी, बडोदा पायोनियर म्युच्युअल फंड
बडोदा पायोनियर म्युच्युअल फंडाची ‘इक्विटी ट्रिगर फंड’ ही नवीन फंड योजना (एनएफओ) सध्या गुंतवणुकीसाठी खुली झाली आहे. यानिमित्ताने या फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी संजय चावला यांनी मिड-कॅप गुंतवणुकीविषयी मते मांडली आहेत. समभाग विश्लेषक म्हणून कारकीर्दीला सुरुवात केलेल्या चावला यांना २५ वर्षांचा मिड-कॅपमधील गुंतवणुकीचा अनुभव आहे.
* रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण दोनच दिवसांपूर्वी जाहीर झाले. कोणताही व्याजदर बदल त्यात करण्यात आला नाही. तुम्ही याबाबत काय सांगाल?
– उद्योग समुदाय, कर्जदार, बँका, वाहन उद्योग, बांधकाम क्षेत्र या पतधोरणांकडे डोळे लावून बसले होते. महागाईचा दर कमी झाल्यामुळे सर्वानाच रेपो दरात कपातीची अपेक्षा होती. परंतु रिझव्‍‌र्ह बँकेने लगेचच दरकपात न करता भविष्यात जेव्हा आíथक संकेत अनुकूल होतील तेव्हा दरकपातीचा विचार करण्याचे ठरविले आहे. आमच्या मते, गव्हर्नर डॉ. राजन यांचे वक्तव्य सुखावणारे आहे आणि पुढील आíथक वर्षांत रेपो दरकपातीला सुरुवात झाली असेल, असा आम्हाला विश्वास आहे.

* समभाग गुंतवणुकीच्या दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्थेकडून काय संकेत मिळत आहेत?
– भारतीय अर्थव्यवस्था गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सध्या सुदृढ आहे. महागाई दरात घसरण झाली आहे. भविष्यातील व्याजदर कपातीचे संकेत मिळत आहेत. तेलाच्या किमतीत घट झाल्याने परकीय चलनातील तूट नियंत्रणात आहे. शिवाय सरकारचा अनुदानावरील खर्चदेखील आटोक्यात आला आहे. या गोष्टी समभाग गुंतवणुकीच्या दृष्टीने सकारात्मक आहेत.

Tata Nifty Auto Index Fund,
वाढत्या वाहन उद्योगाचा लाभार्थी
sebi makes nomination optional for joint mutual fund portfolios
संयुक्त म्युच्युअल फंड खात्यांसाठी नामनिर्देशन आता पर्यायी
Horizon investment of thousand crores in Chakan
होरायझनची चाकणमध्ये हजार कोटींची गुंतवणूक
One to three prize shares from moTilal Oswal Financial
मोतीलाल ओसवाल फायनान्शियलकडून एकास तीन बक्षीस समभाग; नफा चारपट वाढीसह ७२४ कोटींवर

* केंद्रात नवे सरकार येऊन सहा महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे. सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन तुम्ही कसे करता?
– सहा महिने कालावधी हा असा एखाद्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यास अल्प कालावधीच म्हणावा लागेल. परंतु मूल्यमापन करायचे झाल्यास सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सरकार बहुमतातील सरकार आहे. साहजिकच सरकारकडून आíथक सुधारणा अपेक्षित आहेत. सरकारने आíथक सुधारणेच्या दृष्टीने नक्कीच पावले उचलली आहेत. पंतप्रधान जनधन योजना हे आíथक सर्वसमावेशनाच्या दृष्टीने क्रांतीकारक पाऊल म्हणावे लागेल. सरकारी आकडेवारीनुसार, या योजनेअंतर्गत उघडलेल्या बँक खात्यांची संख्या सात कोटीहून अधिक झाली आहे. रेल्वे प्रकल्प, विमा, संरक्षण यातील थेट परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या कमाल मर्यादेत वाढ, २.६ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी, आधी योजलेल्या विविध प्रकल्पांसमोरील पर्यावरणविषयक अडथळे दूर करणे, कमी खर्चाच्या विमानतळ विषयातील धोरण स्पष्टता, नवीन विमान वाहतूक कंपन्यांना परवाने, ही सरकारने उचललेली पावले निश्चितच उद्योगांमध्ये उत्साह वाढविणारी आहेत.

सरकारच्या या धोरणांचा नक्की कोणत्या उद्योग क्षेत्राला फायदा अपेक्षित आहे?
– सरकारच्या वर उल्लेख केलेल्या धोरणाव्यतिरिक्त स्वच्छ भारत अभियान, ‘मेक इन इंडिया’, स्वच्छ गंगा अभियान या सरकारच्या योजनांमध्ये भारतीय उद्योग जगतासाठी अनेक संधी उपलब्ध होतील. याचा उद्योगांना भविष्यात निश्चितच मोठा फायदा होणार आहे. हा फायदा एक-दोन मोजक्या उद्योग क्षेत्रापुरता मर्यादित न राहता सर्वच उद्योगांना तो होईल.

* उद्योगांकडून चढय़ा व्याजदराबाबत तक्रारीचा सूर ऐकायला येतो. यात कितपत तथ्य आहे?
– याबाबत त्यांचे म्हणणे खरे आहे. भारताने २००५ ते २०१४ दरम्यान व्याज दराचे एक संपूर्ण आवर्तन अनुभवले आहे. या कालावधीतील मिड-कॅप कंपन्यांच्या व्याज, घसारा व करपूर्व नफ्याचे एकूण व्याजाच्या खर्चाशी प्रमाण पाहिले असता २००५ ते २००८ दरम्यान व्याजावरील खर्चाचे प्रमाण कमी होत गेले आहे. २०१० ते २०१२ दरम्यान या खर्चात मोठी वाढ झाली. आता व्याजदर कमी होण्यास सुरुवात झाल्यानंतर व विक्री वाढण्यास सुरुवात झाल्यावर हा खर्च पुन्हा कमी होऊ लागेल. थोडय़ाफार प्रमाणात हेच चित्र इतर कंपन्यांचेही दिसते.

* मिड-कॅप शेअरचे मूल्यांकन हे धोकादायक पातळीवर आहे, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. या पातळीवर नवीन गुंतवणूक करताना तुम्ही आश्वासक आहात का?
शेअर बाजारातील नफा (भांडवल वृद्धी) कधीच निर्धोक नसतो. बाजारात धोका पत्करण्याची तयारी नेहमीच असावी लागते. कंपन्यांची गुंतवणुकीसाठी निवड करण्याची आमची स्वत:ची एक पद्धत आम्ही विकसित केली आहे. या पद्धतीचे आम्ही ॅॅअफढ (ॅ१६३ँ अ३ फीं२ल्लुं’ी ढ१्रूी) असे नामकरण केले आहे. सर्वप्रथम आमची निवड समिती गुंतवणुकीचा परीघ ठरवते. या समितीवर आमच्या म्युच्युअल फंडाच्या दोन्ही प्रवर्तकांचे प्रतिनिधी प्रतिनिधित्व करतात. गुंतवणुकीसाठी कोणतीही कंपनी आम्ही निवडण्यापूर्वी ती कंपनी आमच्या या समितीने मंजूर करावी लागते. तसेच आमच्या गुंतवणूक खात्यातील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असणे हे आमचे बलस्थान आहे. ही मंडळी समभाग संशोधन करून आम्हाला आपल्या सूचना व शिफारसी करत असतात. आम्हाला याचा नक्कीच फायदा होतो. आमच्या समभागात अनेक कंपन्या अशा आहेत ज्यांनी आम्हाला मोठी भांडवलीवृद्धी दिली आहे. या कंपन्या ॅॅअफढ पद्धतीचे फलित आहेत. उदाहरण सांगायचे तर आमची गुंतवणूक असलेली एक कंपनी आहे. या कंपनीच्या उत्पादनात दुचाकी उत्पादने, व्यापारी वाहने व एका बहुराष्ट्रीय वाहन उत्पादकाशी तांत्रिक सहाय्याने प्रवासी व व्यापारी वाहने यांचा समावेश होतो. या कंपनीच्या समभागात आम्ही गुंतवणूक करायचे निश्चित केले तेव्हा आम्हाला भारतातील आघाडीच्या दोन दुचाकी उत्पादकांच्या व दोन प्रमुख व्यापारी वाहन निर्मात्यांच्या कंपन्यांत गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध होता. परंतु ॅॅअफढ पद्धतीनुसार आम्ही या कंपनीत गुंतवणूक केली आणि आज आम्हाला आमच्या या निर्णयाचा फायदा झाला. या कंपनीने आम्हाला मोठा भांडवली नफा मिळवून दिला आहे. जेव्हा सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा वेग वाढतो तेव्हा तेव्हा मिड-कॅप हे लार्ज-कॅपपेक्षा सरस कामगिरी करतात. हे लक्षात घेता आम्ही प्रामुख्याने मिड-कॅपमध्ये गुंतवणूक करत आहोत.

या कंपन्या निवडीचे तुमचे निकष काय आहेत?
– सर्वात पहिला निकष कंपनी व्यवस्थापनाचा दर्जा हा आहे. पारदर्शकता, अव्वल व्यवस्थापन पद्धती – ज्या नेहमीच आमच्यासाठी सर्वोच्च स्थानी आहेत व यापुढे ही असतील. याव्यतिरिक्त कंपनीचे उद्योग क्षेत्र, किमतीचे पुस्तकी किमतीशी प्रमाण, भांडवलावर मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण, प्रति समभाग मिळकत हेही इतर निकष आहेत.

बडोदा पायोनियर इक्विटी ट्रिगर फंड सिरीज १
बडोदा पायोनियर इक्विटी ट्रिगर फंड सिरीज १ ही तीन वष्रे मुदतीची (क्लोज एंडेड) योजना असून, ती १९ डिसेंबपर्यंत गुंतवणुकीसाठी खुली आहे. एस अँड पी बीएसई मिड-कॅप हा निर्देशांक या योजनांचा मानदंड असेल. गुंतवणूकदाराला किमान ५००० रुपयांपासून पुढे अशी रक्कम यात गुंतविता येईल. या योजनेत वृद्धी किंवा लाभांश यापकी एक पर्याय गुंतवणूकदाराला निवडावा लागेल. तीन वर्षांच्या आत जर वृद्धी पर्यायाचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) १५ रुपये झाले तर ही योजना मुदतपूर्व बंद होईल. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही शेअर बाजारातील असल्याने जोखमीची असते, म्हणून गुंतवणूकदारांनी योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या आíथक नियोजनकाराच्या सल्ल्याने या फंडात गुंतवणूक करावी.