गेल्या काही महिन्यांत आलेल्या काही चांगल्या ‘आयपीओ’पैकी एक म्हणून गोदरेज अ‍ॅग्रोवेटचा उल्लेख करता येईल. पशुखाद्य, पीक संरक्षण, पाम तेल, डेअरी आणि पोल्ट्री तसेच खाद्यान्न प्रक्रिया अशा विविध व्यवसायांत असलेली सुप्रसिद्ध गोदरेज समूहाची ही कंपनी. गोदरेज अ‍ॅग्रोवेट प्रत्येक व्यवसायात अग्रणी असून संघटित क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. पशुखाद्य व्यवसायात संघटित क्षेत्रात गोदरेज अ‍ॅग्रोवेटचा वाटा २२ टक्के आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे कंपनीला पाम तेल व्यवसायासाठी चार मंडल जमीन नुकतीच देण्यात आली असून त्यामुळे कंपनीचे पाम लागवडीचे क्षेत्र वाढेल.

कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्कात दुपटीने केलेली वाढ (१५ टक्के ते ३० टक्के) कंपनीच्या पथ्यावर पडेल. सोयाबीन, कापूस, मिरची यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असून त्याकरिता कंपनीने यंदा देशभरात चाळीस कार्यक्रम आखले आहेत. डिसेंबर २०१८ साठी संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष जाहीर झाले असून कंपनीने ८६५.७७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३४.४२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे.

demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
Sangli, Citizens Rescue Crocodile, Hand Over to Forest Department, crocodile in sangli, crocodile in human area, crocodile in sangli, Rescue crocodile, crocodile Rescue,
सांगली : नागरी वस्तीत आलेल्या मगरीची नैसर्गिक अधिवासात पाठवणी
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

नुकत्याच स्थिरावलेल्या दुधाच्या किमती कंपनीसाठी फायद्याच्या ठरतील. पनीर, दही आणि आइस्क्रीम या दुग्धजन्य उत्पादनांसाठी त्याचा फायदा होईल. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत नक्त नफा ३८ टक्क्यांनी कमी असला तरीही उत्तम आणि अनुभवी प्रवर्तक तसेच लाभदायी ठरू शकणारा व्यवसाय यामुळे कंपनीचे भवितव्य उज्ज्वल वाटते.

प्रति शेअर ४५० रुपये अधिमूल्य मिळवून शेअर बाजारात प्रवेश केल्यानंतर, साधारण ५६०-५७५ रुपयांना गोदरेज अ‍ॅग्रोवेटचा शेअर आज उपलब्ध आहे. आजपर्यंतची गोदरेज समूहाची कारकीर्द पाहता येत्या तीन वर्षांत गोदरेज अ‍ॅग्रोवेट पहिल्या तीन कंपन्यांत असेल. एक उत्तम दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून हा शेअर खरेदी करत राहावा असा आहे.