27th February Marathi Horoscope: २७ फेब्रुवारी २०२४ ला माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील तृतीया तिथीला शुभ दिवस असणार आहे. पंचांगानुसार उद्या कन्या राशीत चंद्र विराजमान असणार आहे. या दिवशी संपूर्ण रात्रभर हस्त नक्षत्र प्रभावी असणार आहे. गण्ड व शूल यो या दिवशी जुळून येत आहेत. या मंगळवारी नेमक्या कोणत्या राशीला लाभ व कुणाला कष्ट पडणार आहे हे पाहूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष:-घरगुती वातावरण प्रसन्न असेल. प्रवासात काळजी घ्यावी. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. व्यवसाय वाढीचा विचार करावा. नवीन मित्र जोडाल.

वृषभ:-एकमेकांची बाजू समजून घ्यावी. वडीलधार्‍यांचा विरोध होऊ शकतो. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. हातातील कामात यश येईल. अचानक धनप्राप्ती संभवते.

मिथुन:-आवडीचे पदार्थ खाल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. भावनेला आवर घालावी लागेल. वरिष्ठांना नाराज करू नका.

कर्क:-कामात चंचलता आड आणू नका. अति भावनाशील होऊ नका. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. पोटाची काळजी घ्यावी.

सिंह:-जोडीदाराची व्यवहार कुशलता दिसून येईल. मनातील चिंता सतावत राहील. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळतील.

कन्या:-घरातील गोष्टींमध्ये व्यग्र राहाल. प्रेमसंबंध सुधारतील. जोडीदाराची बाजू विरोधी वाटू शकते. मुलांच्या समस्या जाणवतील. जोडीदाराचे हट्ट पुरवावे लागतील.

तुळ:-हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल. नसते धाडस अंगाशी येऊ शकते. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. कामात चंचलता जाणवेल.

वृश्चिक:-हातातील कामात यश येईल. फसवणुकीपासून सावध रहा. मानापमानात अडकू नका. परोपकाराची जाणीव ठेवावी. धार्मिक कामात सहभाग नोंदवावा.

धनू:-स्वभावात चिडचिडेपणा येईल. कामातील उत्साह वाढेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. पित्त-विकार बळावू शकेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

मकर:-सामाजिक वादात अडकू नका. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. आरोग्याबाबत सतर्क राहावे. कौटुंबिक बदलाला सामोरे जावे लागेल.

कुंभ:-मनमोकळ्या गप्पा माराव्यात. बौद्धिक दृष्टिकोन ठेवाल. प्रत्येक गोष्टीत व्यवहार आड आणू नका. छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा. झोपेची तक्रार जाणवेल.

हे ही वाचा<< १८ वर्षांनी बुध-राहू युती बनल्याने एका झटक्यात ‘या’ ५ राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुम्हीही होणार कोट्याधीश?

मीन:-इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मुलांकडून चांगल्या बातम्या येतील. रेस जुगारातून लाभ संभवतो. स्व‍च्छंदी वृत्तीने वागाल. बौद्धिक चलाखी दाखवाल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 27th february marathi panchang ganesh krupa on these lucky rashi mesh to meen who will get mangal labh money todays astrology svs
First published on: 26-02-2024 at 19:02 IST