Devendra Fadnavis Astrology Kundali Predictions: देवेंद्र फडणवीस यांचा मूलांक चार तर भाग्यांक नऊ आहे. देवेंद्र फडणवीसांची जन्मतारीख आहे, २२- ७- १९७०. फडणवीसांचा मूलांक म्हणजे फक्त जन्मतारखेची बेरीज ४ आहे (२+२ = ४) तर जन्मतारीख, महिना, वर्षाची बेरीज केल्यावर भाग्यांक येतो (२+ २+ ७ + १ +९+ ७+०= २८, २+८= १०, १+०= १) १. शिवाय फडणवीसांच्या जन्मवर्षातील (१९७०) शून्य हा त्यांच्या राजकीय प्रगतीत हातभार लावू शकतो. मात्र २०२४ हे साल फडणवीसांना सुद्धा काहीसे त्रासदायक व वेदनादायक ठरू शकते. घाईगर्दीने शत्रूवर मात करण्याच्या हेतूने चुकीचे निर्णय घेऊ नयेत, कारण तात्पुरता आनंद देणारे निर्णय हे दीर्घकालीन त्रासदायक ठरू शकतात.

निर्णय चुकीचे तर ठरत नाहीत ना?

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रिकेचा अभ्यास करताना काही अचंबित करणाऱ्या बाबी आढळून आल्या. कुंडलीतील प्रमुख केंद्रस्थानी विशेषतः एक, सात व दशम स्थानातील, गुरु, शनी, मंगळ, रवी या मातब्बर ग्रहांची बैठक त्यांच्या राजकीय जीवनाला उत्तेजित करणारी आहे. चंद्र गुरु नवपंचम योग तसेच शुक्र गुरु त्रिएकादश शुभ योग भारताच्या भावी नेतृत्वाची चाहूल दाखवत आहे. पंचमातील चंद्र गुरु योग हा क्लेशदायक ठरू शकतो. त्यांच्या कुंडलीत सध्या शनीची साडेसाती चालू आहे, अशातच १५ मार्च ते २३ एप्रिल २०२४ या कालावधीत त्यांच्या कुंडलीतील मंगळाचे वास्तव्य क्लेशदायक ठरू शकते. आपण घेतलेले निर्णय चुकीचे तर ठरत नाहीत ना, या विचारांनी मानसिक चढउतार जाणवू शकतात.

हे ही वाचा<< “उद्धव ठाकरेंचा घात करू शकतात ‘ही’ माणसं, जून २०२४ मध्ये..”, ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी, लवकरच..

फडणवीसांना दिल्लीत मान

आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. रवी मंगळ युती असल्याने त्वरित निर्णय घेणे टाळावे. २६ जानेवारी २०२५ पर्यंत केतू महादशेत बुधाची अंतर्दशा असणार आहे. याबाबत आपण घेतलेल्या विविध भूमिकांचा पक्षाला फायदा होऊ शकतो. भाजपाच्या कुंडलीत षष्टात नेपच्यून चंद्राची युती आहे आणि आता चंद्राची महादशा चालू आहे. अशा स्थितीत नेतृत्व करताना आपल्याकडून कोणत्याही गीष्टीचा अतिरेक होणार नाही याची काळजी घ्यावी. पुढील काही काळात केंद्रात आपले महत्त्व वाढेल, नेतृत्वाची संधी लाभेल आणि महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने आपली सात्विकता दिसून येईल.