Guru Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतात. १ मे २०२४ पासून दुपारी २ वाजून २९ मिनिटांनी गुरू वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. १५ मे २०२५ पर्यंत गुरू याच राशीमध्ये विराजमान राहील. वृषभ राशी ही शुक्र ग्रहाची राशी आहे. अशात शुक्राच्या राशीमध्ये गुरू प्रवेश करताना अनेक राशींना फायदा होऊ शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार गुरू मान सन्मान, धन संपत्ती, राजकीय आणि अपत्य कारक ग्रह मानला जातो. हा एका राशीमध्ये जवळपास एक वर्ष विराजमान राहतो. पुन्हा त्याच राशीमध्ये तब्बल १२ वर्षानंतर प्रवेश करतो. यावेळी गुरू ग्रहाचा वृषभ राशीमध्ये प्रवेश काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. गुरुच्या गोचरची कोणत्या राशींवर कृपा राहील, जाणून घेऊ या.

वृषभ राशी

गुरू ग्रहाचे गोचर वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये भरपूर यश मिळेस आणि जुन्या अडचणींपासून सुटका मिळेल. ही वेळ यांच्यासाठी भाग्याची राहील आणि त्यांनी घेतलेले निर्णय भविष्यात नवीन संधी मिळून देतील. या वेळी गुंतवणूक केली तर या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहील.

हेही वाचा : Lakshmi Narayan Yog : लक्ष्मीनारायण योग तयार झाल्याने ‘या’ राशींना मिळणार छप्परफाड पैसा, अचानक होणार धनलाभ

मिथुन राशी

गुरूच्या कृपेमुळे मिथुन राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवू शकते. संशोधन कामात या लोकांना फायदा होऊ शकते. या लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ मदत करतील. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकतो. या लोकांचे वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी लाभेल. खास व्यक्तीबरोबर भेट होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होईल.

कर्क राशी

गुरूचे गोचर कर्क राशीसाठी मे महिन्यात भाग्याचे ठरू शकते. या लोकांना नवीन कमावण्याचे स्त्रोत मिळू शकते.याशिवाय या लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. प्रेम संबंधामध्ये सुख समृद्धी नांदेल

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)