Premium

तब्बल ५०० वर्षांनी ‘कुलदीपक राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? २०२४ पासून मिळू शकतो बक्कळ पैसा

‘कुलदीपक राजयोग’ बनल्याने काही राशींना २०२४ मध्ये प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात…

Kuldeepak Rajyog
'या' राशी होणार श्रीमंत? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Kuldeepak Rajyoga 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह प्रत्येक महिन्यात राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतात. ज्याचा परिणाम मानवी आयुष्यावर होतो. देव गुरुने मेष राशीत गोचर केला आहे. तर ३१ डिसेंबरला देव गुरु मार्गी होणार आहेत. अशातच देव गुरु मेष राशीत असल्याने ‘कुलदीपक राजयोग’ तयार होत आहे. हा राजयोग तब्बल ५०० वर्षांनी बनल्याने काही राशींना येत्या नवीन वर्षांत धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींना होणार धनलाभ?

मेष राशी

मेष राशींच्या लोकांसाठी ‘कुलदीपक राजयोग’ लाभकारी ठरु शकतो. या राशीतील लोकांना चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात. अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला प्रचंड फायदा मिळू शकतो. त्यामुळे या काळात तुमचं आर्थिक उत्पन्न वाढू शकतं. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते. तुमचं आरोग्य ठणठणीत राहू शकतं.

(हे ही वाचा : ‘लक्ष्मी नारायण योग’ तयार झाल्याने ‘या’ राशी पुढील वर्षात होणार श्रीमंत? लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर मिळू शकतो प्रचंड पैसा )

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना नवीन वर्षांत अच्छे दिन अनुभवायला मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळू शकतो. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो आणि गुंतवणुकीतही तुम्हाला आर्थिक नफा मिळू शकतो. जमीन आणि मालमत्तेच्या खरेदी-विक्रीमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढू शकतो.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना ‘कुलदीपक राजयोग’ बनल्याने  प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतो. जुनी देणी परत मिळू शकतात. व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळू शकते. आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊ शकतात. रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. नव्या वर्षात नोकरीच्या नव्या संधी मिळू शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Horoscope 2024 guru planet will make kuldeepak rajyoga these three zodiac signs bank balance to raise money pdb

First published on: 03-12-2023 at 18:17 IST
Next Story
पुढील वर्षात ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन? २९ दिवसानंतर देवगुरु पुन्हा मार्गी होताच लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकता लखपती