हिंदू धर्मात शनिवार हा शनिदेव आणि भैरव देव यांना समर्पित आहे. असे मानले जाते की ज्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते त्यांना आयुष्यात कशाचीही कमतरता नसते. त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळते. त्या व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मी वास करते. शनिवारी शनिदेवाची पूजा करून मोहरीचे तेल आणि काळे तीळ वगैरे अर्पण केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन भक्तांवर आशीर्वाद देतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर, शास्त्रात शनिवारी अशी काही कामे सांगितली आहेत, जी करण्यास मनाई आहे. जर एखाद्या व्यक्तीने चुकूनही या गोष्टी केल्या तर शनिदेवाचा त्यांच्यावर कोप होतो. एवढेच नाही तर व्यक्तीच्या कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत होते, कोणते ही काम करत असाल तर ते खराब होऊ लागते. तसेच शनिदेवाच्या कोपाचे बळी व्हावे लागते.

आणखी वाचा : लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यांना पाहून माधुरीचे पती डॉ नेने, म्हणाले “मी यांना…”

जाणून घेऊया शनिवारी कोणत्या गोष्टी टाळाव्यात

शनिवारी ही काम करू नका

चुकूनही मोहरीचे तेल खरेदी करू नका
ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी मोहरीचे तेल किंवा इतर कोणतेही तेल खरेदी करू नका. या दिवशी तेल खरेदी केल्याने घरात दारिद्र्य येते. या दिवशी तेलाचे दान करावे. विशेषतः मोहरीचे तेल दान करणे शुभ मानले जाते, असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात.

शनिवारी केस धुवू नका
काही लोकांना नियमितपणे केस धुण्याची सवय असते. मात्र लोकांनी हे लक्षात ठेवावे की, शनिवारी चुकूनही केस धुवू नका. विशेषतः महिला या दिवशी केस धुतल्याने घरावर वाईट परिणाम होतो.

आणखी वाचा : मराठीतला आजवरचा सर्वात BOLD टीझर, तेजस्विनी पंडीतच्या ‘रानबाजार’ची झलक पाहिलीत का?

लोखंड खरेदी करू नका
शनिवारी घरात कोणत्याही प्रकारची लोखंडी वस्तू आणण्यास मनाई आहे. हे ज्योतिषशास्त्रात अशुभ मानले जाते. असे मानले जाते की शनिदेवाकडे लोखंडी शस्त्र आहे, म्हणून ते शनिदेवाचे धातू मानले जाते आणि या दिवशी या वस्तू घरी आणू नका.

मांस खाणे टाळा
शनिवारी कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नये असे धार्मिक ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही मांसाहार केला तर तुम्हाला शनिदेवाच्या प्रकोपाचे शिकार व्हावे लागू शकते. या दिवशी गरजूंना शक्य तितकी मदत करा, असे केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते.

आणखी वाचा : बाळासाहेबांचा मुलगा CM, ‘शिष्य’ शिंदे मंत्री, मुलगा खासदार पण आनंद दिघेंच्या…; निलेश राणेंची पोस्ट चर्चेत

मीठ खरेदी करू नका
या दिवशी मोहरीच्या तेलासोबत मीठही घरी आणू नये. या दिवशी मीठ आणणे अशुभ मानले जाते. या दिवशी मीठ आणल्याने घरातील ऋण वाढते आणि व्यक्तीला अनेक रोग होण्याची शक्यता असते.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saturday vastu tips these things never do on saturday even by mistake dcp