Shani dev Astrology : शनिदेव ही न्याय देवता असून कर्मानुसार माणसाला फळ देते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव जून महिन्यात वक्री होणार आहे म्हणजे उलट चाल चालणार आहे. शनिदेव ३० वर्षानंतर त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभमध्ये वक्री होणार आहे. शनिच्या या चालीमुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते. या राशीच्या लोकांना व्यवसायाच्या ठिकाणी आणि नोकरीच्या ठिकाणी यश मिळू शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या?

कुंभ राशी (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांना शनि देवाची वक्री फायद्याची ठरू शकते कारण शनिदेवाने या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये शश राजयोग तयार केला आहे त्याचबरोर शनि देव या राशीच्या लग्न भावमध्ये वक्री करणार आहे. या काळात या लोकांचे व्यक्तिमत्त्व उजळून निघेल. याचबरोबर व्यवसायात नवीन कल्पना कामी येऊ शकते. नशीबाचा साथ मिळाल तर यांची प्रगती होऊ शकते. बहीण भावांमध्ये संबंध दृढ होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. त्याचबरोबर या लोकांच्या वैवाहीक आयुष्यात सु्द्धा सुख समृद्धी लाभेल. या लोकांनी ठरविलेल्या गोष्टी पूर्ण होती. या लोकांचा समाजात मान सन्मान वाढेल.

हेही वाचा : १०० वर्षांनी अक्षय्य तृतीयेला शुभ योग; ‘या’ राशींचे नशीब सोन्याहून अधिक चमकणार? मिळू शकते कोट्यवधींचे मालक होण्याची संधी

वृश्चिक राशी (Scorpio)

शनिदेवाची उलट चाल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ राहील कारण शनिदेव या राशीच्या गोचर कुंडलीच्या चतुर्थ भावमध्ये वक्री होणार आहे. यामुळे या लोकांना भौतिक सुख प्राप्त होऊ शकते. या काळात या राशीचे लोक संपत्ती आणि वाहन खरेदी करू शकतात. या लोकांची व्यवसायात प्रगती होईल आणि चांगल्या संधी मिळतील. हे लोक पैशांची चांगली बचत करू शकणार. त्याचबरोबर जे लोक प्रॉपर्टी, जमीन, संपत्तीशी निगडीत काम करतात त्यांना मोठे यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नती होण्याची शक्यता आहे.

सिंह राशि (Leo Zodiac)

शनिदेवाची वक्री सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ फळ देणारी ठरू शकते.कारण शनिदेव या राशीच्या सातव्या भावात उलट चाल चालणार आहे. शनिदेवाच्या वक्रीमुळे विवाहित लोकांच्या वैवाहीक आयुष्यात सुख समृद्धी दिसून येईल. या लोकांच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. सिंह राशीच्या लोकांची आर्थिक वृद्धी होईल. आर्थित बचत करण्यात हे लोक यशस्वी होईल. त्याचबरोबर या काळात या लोकांना समाजात मान सन्मान प्राप्त होईल. दैनिक पगारात वाढ होऊ शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)