Chaitra Ram Navami 2024 : रामनवमी हा हिंदू सण रामाचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो. रामायणानुसार,चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला रामाचा जन्म झाला होता. हिंदू धर्मात प्रभू रामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदाची रावनवमी अधिक खास असणार आहे. अनेक रामभक्त राम जन्मभूमी अयोध्येत सुद्धा दर्शनासाठी जाणार. या वर्षी जानेवारीमध्ये अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. तुम्हाला माहिती आहे का यंदा रामनवमी कधी आहे? १६ एप्रिल की १७ एप्रिल? आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.

केव्हा आहे रामनवमी?

हिंदू पंचांगनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाला येणारी नवमीची तिथी १६ एप्रिल मंगळवार, दुपारी १ वाजून २३ मिनिटांनी सुरू होत आहे तर १७ एप्रिल दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी समाप्त होईल. अशात उदया तिथि नुसार रामनवमी ही १७ एप्रिल २०२४ ला आहे.

हेही वाचा : Surya Gochar 2024 : २४ तासांमध्ये पालटणार ‘या’ राशींचे नशीब, एका महिन्यात मिळणार भरघोस पैसा अन् यश

राम नवमी शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगमध्ये शुभ मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.रामनवमीच्या दिवशी तुम्ही रामाची पूजा सकाळी ११ वाजून १ मिनिटापासून ते दुपारी १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत करू शकता. एकुण वेळ २ तास ३५ मिनिटे आहे.

विजय मुहूर्त- दुपारी २ वाजून ३४ मिनिटांपासून ३ वाजून २४ मिनिटांपर्यंत
गोधूलि मुहूर्त – सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपासून ते ७ वाजून ९ मिनिटांपर्यंत

हेही वाचा : हनुमान जयंतीनंतर ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? अनेक वर्षांनी ‘शुक्रादित्य राजयोग’ घडल्याने मिळू शकते व्यवसायात मोठे यश

रामनवमी शुभ योग

हिंदू पंचांगनुसार, रामनवमीच्या दिवशी आश्लेषा नक्षत्राबरोबर रवि योग, सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. या दिवशी सकाळी ५ वाजून १६ मिनिटांपासून ते ६ वाजून ८ मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धि योग असेल. याचबरोबर रवि योग संपूर्ण दिवसभर असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)