रंग दे बसंती चित्रपटाची कथा चोरल्याच्या आरोपातून दिग्दर्शक राकेश मेहरा दोषमुक्त

मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन यांचा असा दावा होता की, त्यांनी ‘इन्कलाब’ नावाची चित्रपटाची कथा लिहिली होती.

औरंगाबाद,- ‘रंग दे बसंती’ ची कथा  चोरल्याच्या आरोपातून दिग्दर्शक राकेश मेहरा यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ०ही. एच. खेडकर यांनी दोषमुक्त केले.

 औरंगाबाद येथील मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन यांनी रंग दे बसंती या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा व सहदिग्दर्शक रोनी स्क्रुवाला यांच्याविरोधात कथा चोरल्याचा म्हणजेच कॉपी राईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात केला होता. या प्रकरणात सुनावणी सुरु असताना चित्रपटाचे सहदिग्दर्शक रोनी स्क्रुवाला यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या कृतीला आव्हान दिले होते. त्यात न्यायालयाने रोनी स्क्रुवाला यांच्या बाजूने निकाल दिला होता व त्यामुळे रोनी यांच्याविरोधातील गुन्हा रद्दबातल झाला होता. 

त्यानंतर दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी अ‍ॅड्. दीपक एस मनुरकर यांच्यामार्फत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात मूळ नियमित फौजदारी प्रकरणात एक फौजदारी अर्ज (डिस्चार्ज अ‍ॅप्लिकेशन) सादर करुन राकेश मेहरा यांना कॉपी राईट कायद्याचे उल्लंघन केल्याच्या कलमांमधून मुक्त करावे अशी विनंती केली. मुश्ताक मोहसीन मुबारक हुसेन यांचा असा दावा होता की, त्यांनी ‘इन्कलाब’ नावाची चित्रपटाची कथा लिहिली होती. ती असोसिएशनकडे रजिस्टर्ड केली होती. १९९९ साली ही कथा दिग्दर्शक राकेश मेहरा यांना ऐकवली होती. त्यानंतर मेहरा यांनी या कथेवर २००६ मध्ये ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट तयार केला आहे. ही आपल्या कथेची चोरी आहे. 

न्यायालयात अ‍ॅड्. दीपक मनुरकर यांनी युक्तीवाद केला की, मुश्ताक मोहसीन यांनी त्यांची मूळ कथा रजिस्ट्रर केलेली नाही या मुद्द्यावर सहदिग्दर्शक रोनी स्व्रुâवाला यांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केलेला आहे. मुश्ताक मोहसीन यांनी त्याविरुध्द वरिष्ठ न्यायालयात अपीलही केलेले नाही. त्यामुळे या प्रकरणी कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन सिध्द होत नाही. अशा वेळी दोषारोप केल्यास तो आधारहीन (ग्राऊंडलेस) ‘रेल. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही एच खेडकर यांनी हा युक्तीवाद मान्य करीत राकेश मेहरा यांना दोषमुक्त करत मेहरा यांचा डिस्चार्ज अर्ज मंजूर केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Director rakesh mehra acquitted of stealing the story of rang de basanti akp

Next Story
म्हाडामध्ये आता स्पर्धात्मक निविदा
ताज्या बातम्या