छत्रपती संभाजीनगर – शहरातील पैठणगेटसारख्या बाजारपेठीय भाग असलेल्या वाहनतळाजवळ एका मोबाईल फोनच्या दुकानाजवळ पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा मोठी रोकड जप्त केली. पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात सहायक पोलीस आयुक्त शिंदे, पोलीस उपनिरीक्षक मुंडे व इतर सहकाऱ्यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेली ३९ लाख ६५ हजार असून, त्यामध्ये पाचशेच्या अधिक नोटा आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रक्कम नेमकी कशासाठी आणली होती, याची रात्रीपर्यंत माहिती मिळू शकली नाही. मात्र निवडणुकीशी संबंधितच रक्कम वाटप करण्यासाठी आणल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.  या प्रकरणी चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरमधील लोकसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी सायंकाळी थंडावला आहे. सोमवारी मतदान असून, संबंधित जप्त करण्यात आलेली रक्कम निवडणुकीच्या काळात  वाटप करण्याच्या उद्देशाने आणण्यात आल्याचा अंदाज आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huge cash seized in chhatrapati sambhajinagar amy