महिंद्राने अलीकडेच आपली नवीन कॉम्पॅक्ट SUV XUV 3XO भारतात लाँच केली आहे, ज्याच्या किमती ७.४९ लाख रुपयांपासून सुरू आहेत. या कारची थेट स्पर्धा Kia Sonet, Hyundai Venue आणि Tata Nexon यासारख्या कारशी आहे. कंपनीने या कारचे बुकींग १५ मे पासून सुरू केले असून २६ मे २०२४ ला कारच्या डिलिव्हरीला सुरूवात झाली. तुम्हाला या कारमध्ये अनेक प्रकार मिळतील. महिंद्रा XUV 3XO एसयूव्ही एकूण ९ व्हेरिएंटमध्ये आणि ३ इंजिन ऑप्शनमध्ये येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, महिंद्रा दर महिन्याला नवीन XUV 3XO च्या ९,००० युनिट्सचे उत्पादन करेल. १०,००० युनिट्स आधीच तयार आहेत. कंपनीला आपला प्रतीक्षा कालावधी बराच कमी करायचा आहे. नवीन XUV 3XO ची मागणी यावेळी खूप जास्त आहे. सूत्रानुसार, त्याचा प्रतीक्षा कालावधी सुमारे ६ महिन्यांपर्यंत जाऊ शकतो. १ तासात या कारला ५० हजाराहून अधिक बुकींग मिळाले आहे.

महिंद्राने XUV 3XO चे ९ प्रकार सादर केले आहेत, ज्यात MX1, MX2, MX3, MX2 Pro, MX3 Pro, AX5, AX5L, AX7 आणि AX7L यांचा समावेश आहे. या कारच्या AX5 आणि AX5 L प्रकारांना सर्वाधिक बुकिंग मिळाले आहे. किमतीबद्दल बोलायचे झाले तर AX5 व्हेरिएंटची किंमत १०.६९ लाख रुपये आहे तर AX5 L व्हेरिएंटची किंमत १०.९९ लाख रुपये आहे.

इंजिनबद्दल बोलायचे तर नवीन याशिवाय, त्याचे दुसरे इंजिन देखील १.२L टर्बो पेट्रोल आहे जे ९६kW ची शक्ती आणि २०० Nm टॉर्क देते. त्याचे तिसरे १.५L टर्बो डिझेल इंजिन ८६Kw ची शक्ती आणि ३०० Nm टॉर्क देते. ही इंजिने मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेसने सुसज्ज आहेत आणि २१.२ किमी/ली पर्यंत मायलेज देतात.

या एसयूव्हीला XUV300 च्या तुलनेत खूपच नवीन डिझाइन देण्यात आले आहे. यामध्ये, कंपनीने स्प्लिट एलईडी हेडलाइट सेटअपसह फ्रंटमध्ये सी-आकाराचे एलईडी डीआरएल, मेश पॅटर्नमध्ये ब्लॅक आऊट ग्रिल आणि फ्रंट बंपर पुन्हा डिझाइन केले आहे.

सुरक्षेसाठी, यात लेव्हल २ ADAS, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम, ६ एअरबॅग्ज, सर्वात मोठा सनरूफ आणि ३६० डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत. याच्या सर्व सीट आरामदायी आहेत आणि तुम्हाला या वाहनात उत्तम जागा मिळते. सामान ठेवण्यासाठी ३६४ लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे, जिथे तुम्ही बरेच सामान ठेवू शकता.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra starts xuv 3xo suv delivery here are price engine features pdb
Show comments