Premium

लवकरच रेनॉल्टची इलेक्ट्रिक कार होणार लाँच! डिझाइनपासून ते फिचरपर्यंत ‘या’ गोष्टी असणार खास…

रेनॉल्ट कंपनीने चाहत्यांसाठी इलेक्ट्रिक कार सादर केली आहे…

Renault electric car will be launched soon global debut on feb 26 at geneva
(फोटो सौजन्य: @Financial Express) लवकरच रेनॉल्टची इलेक्ट्रिक कार होणार लाँच! डिझाइनपासून ते फिचरपर्यंत 'या' गोष्टी असणार खास…

भारतात इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्या ग्राहकांसाठी खास कार घेऊन येत आहेत. तर यातच आता फ्रेंच कार निर्मातासुद्धा अनोखी इलेक्ट्रिक कार लाँच करण्यासाठी सज्ज झाले आहेत. कंपनीने चाहत्यांसाठी ५ ई-टेक इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. रेनॉल्टने आगामी ५ ई-टेक (5 E-Tech) इलेक्ट्रिक कार टीझर इमेजेस प्रदर्शित केल्या आहेत. या अगोदर २०२१ मध्ये याचा एक कॉन्सेप्ट प्रोटोटाइप समोर आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेनॉल्ट ५ ई-टेक (5 E-TECH) कार प्रत्यक्षात Vasarely १९७२ पासून प्रेरित असल्याचे दिसते. तसेच रेनॉल्टने ५ ई-टेक कार भविष्याचा विचार करून डिझाइन करण्यात आली आहे. कारण ती पूर्णपणे इलेक्ट्रिकवर आधारित आहे. रेनॉल्टने सांगितल्याप्रमाणे, आगामी ५ ई टेक ईव्हीचा (5 E-Tech EV) ग्लोबल प्रीमियर २६ फेब्रुवारी २०२४ रोजी जिनिव्हा इंटरनॅशनल मोटार शोमध्ये होणार आहे.

तसेच फ्रेंच कार निर्मात्याने आगामी ५ ई-टेकच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांचा खुलासा केला आहे ते पाहू…

रेनॉल्टचे ५ ई-टेक डिझाइन (Renault 5 E-Tech Design) :

टीझर इमेजेसमध्ये इलेक्ट्रिक कारच्या विशिष्ट मॉडेलचे भाग हायलाइट होत आहेत, ज्यात तुम्हाला एलईडी हेडलाइट्स मानवी डोळ्याच्या आकारासारखी दिसून येईल. तसेच कारच्या बोनेटवरील चार्ज इंडिकेटर लाइट आहे, जी आर५ (R5) जागेवर एअर इनटेक स्थानावर आहे. इलेक्ट्रिक कार पूर्ण चार्ज झाल्यावर इंडिकेटवरील पाच अंक चमकतो. चाकांच्या कमानी, ज्या कारला कॉम्पॅक्ट आकारमान असूनही गाडीला एक व्यापक स्वरूप देतात. तसेच कारला एक व्हर्टिकल एलईडी लाईट आहे; जी सी-पिल्लर ( C-pillar) बरोबर चालते. तसेच रेनॉल्ट ५ ई-टेक ही कार ३.९२ मीटर लांब आहे.

हेही वाचा…ऐन थंडीच्या दिवसांत तब्बल १ कोटी रुपयांच्या ‘या’ कारला लागली आग, Video होतोय व्हायरल, कारण आलं समोर…

रेनॉल्टचे ५ ई-टेक स्पेक्स आणि फिचर (Specs & features) ;

फ्रेंच कार निर्मात्याने सांगितले आहे की, ५ ई-टेक ५२ केडब्ल्यूएच (52 kWh) बॅटरीसह सुसज्ज असेल, जी डब्ल्यूएलटीपी (WLTP) चाचणी प्रोटोकॉलनुसार कार पूर्ण चार्ज झाल्यावर २४८ मैल (३९७ किमी) पर्यंतची रेंज देऊ शकते. तर, ५ ई-टेक पहिली कार आहे, जी नवीन एएमपीआर AmpR स्मॉल प्लॅटफॉर्मवर आधारित आहे; जी पूर्वी सीएमएफ-बी-ईव्ही (CMF-B EV) प्लॅटफॉर्म म्हणून ओळखली जात होती.

रेनॉल्टचा दावा आहे की, ५ ई-टेकमध्ये रेनो, रेनॉल्टचा अधिकृत अवतार यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असेल. Bi-directional ऑनबोर्ड चार्जरसह, रेनॉल्ट ५ ई-टेक इलेक्ट्रिक हे वाहन टू ग्रिड (V2G) तंत्रज्ञान वैशिष्ट्यीकृत करणारे ब्रँडचे पहिले वाहन आहे. Mobilize द्वारे समर्थित, वाहन टू ग्रिड तंत्रज्ञान ५ ई-टेक ग्रीडला ऊर्जा पुरवण्याची परवानगी देते. या तंत्रज्ञानामुळे ड्रायव्हर चार्जिंगवर पैसे वाचवू शकतील आणि ग्रीडला वीज परत विकून त्यांचे एकूण वीज बिल कमी करू शकतील.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Renault electric car will be launched soon global debut on feb 26 at geneva asp

First published on: 02-12-2023 at 18:44 IST
Next Story
मारुती सुझुकीने ‘हे’ स्पेशल एडिशन केले लाँच! ग्राहकांसाठी किमतीत दोन लाखांची कपात…