Success Story: भारतातील आघाडीच्या व्यावसायिक व्यक्तींनीही त्यांच्या आयुष्यात कधी काळी अनेक संकटांचा सामना केलेला असू शकतो. त्यांनीही नकार, अपमानांचा सामना केला असेल याची आपल्याला कित्येकदा जाणीव नसते. परंतु, अशा व्यक्ती समोर येणाऱ्या संकटांकडे पाहून खचून जात नाहीत. त्याउलट त्या जिद्दीने उभे राहतात. आज आम्ही तुम्हाला ‘भारतीय आयटी क्षेत्राचे जनक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि ‘इन्फोसिस’चे सह-संस्थापक असलेल्या एन. आर. नारायण मूर्ती यांच्या प्रेरणादायी प्रवासाबाबत सांगणार आहोत.

नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी कर्नाटकातल्या चिक्कबल्लापुरा जिल्ह्यातील सिडलघट्टा या छोट्याशा गावात झाला. त्यांना लहानपणापासून शिक्षण आणि तंत्रज्ञानाची आवड होती. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)मधून पदवी प्राप्त केली आणि आयटी क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केली.

विप्रो कंपनीतून मिळाला नकार

नारायण मूर्ती यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात विप्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज केला; परंतु त्यावेळी त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. परंतु, त्यांनी निराश न होता, स्वतःचं काहीतरी उभं करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: Success Story : सामान्य कुटुंबात जन्म, सहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण; पण, तरुणपणी मेहनतीने उभी केली तब्बल करोडोंची कंपनी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९८१ मध्ये इतर सहा इंजिनीयर आणि थोड्या भांडवलासह नारायण मूर्ती यांनी ‘इन्फोसिस’ची सह-स्थापना केली. त्यांना एक अशी कंपनी उभी करायची होती, जी जागतिक आयटी कंपन्यांसमोर टिकू शकेल. नारायण मूर्ती यांनी आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करून, एका छोट्या भांडवलातून लावलेल्या उद्योगरूपी रोपाचे आघाडीच्या जागतिक तंत्रज्ञान सेवा प्रदाता कंपनीरूपी वटवृक्षात रूपांतर केले. आज इन्फोसिस ही भारतातील सर्वांत मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असून, तिचे बाजार भांडवल ८,०७,०४६ कोटी आहे. तसेच मूर्तींची वैयक्तिक संपत्ती ४१,५०० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.