सध्या ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व आणि पसंती दोन्हीही वाढत असल्याचे दिसत आहे. पेट्रेल किंवा डिझेलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषण होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच आपल्या पृथ्वीसाठीदेखील या गाड्या उपयोगाच्या आहेत, असे समजले जाते. अनेकांनी त्यांच्या पेट्रोलच्या गाड्या इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये बदलून घेतल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भविष्यात याच वाहनांचा वापर सर्वाधिक होऊ शकतो, असे सध्याच्या एकंदरीत स्थितीवरून दिसते. मात्र, ही वाहने चार्ज करताना वापरकर्त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. गाडी १०० टक्के चार्ज करणे, वाहन वापरल्यानंतर लगेचच त्याची बॅटरी चार्जिंगला लावणे, ती संपूर्ण ड्रेन करणे [शून्य टक्क्यावर आणणे] किंवा सतत चार्ज करीत राहणे यांसारख्या सामान्य गोष्टी जर तुम्ही करीत असाल, तर वेळीच थांबा. इलेक्ट्रिक वाहनांना योग्य पद्धतीने चार्ज कसे करायचे ते पाहा.

हेही वाचा : Traffic tips : शहरातील रोजच्या ट्रॅफिकचा त्रास कसा टाळावा? पाहा या सोप्या ट्रिक्स

१. बॅटरी ओव्हरचार्ज करू नये

जवळपास सगळ्यांनाच कोणतीही इलेक्टिक वस्तू १००% चार्ज करण्याची सवय असते. मात्र, अशा सवयीचा परिणाम तुमच्या बॅटरीच्या आरोग्यावर होत असतो. वाहनांची बॅटरी कधीही संपूर्णपणे चार्ज करू नका. खरे तर गाड्यांमध्ये बसविलेल्या बॅटरीमधील लिथियम आयन हे केवळ ३० ते ८० टक्के चाजिंगवर सर्वोत्तम काम करते. परंतु, सातत्याने बॅटरी संपूर्णपणे म्हणजे १०० टक्के चार्ज केल्याने त्यांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे शक्यतो इलेक्ट्रिक वाहने ८० टक्क्यांपर्यंतच चार्ज करावीत.

२. बॅटरी संपूर्णतः ड्रेन होऊ देऊ नये

तुमच्या गाडीतील बॅटरी कधीही पूर्णपणे ड्रेन होऊ देऊ नका. म्हणजे गाडी शून्य टक्क्यावर आणू नये. सतत गाडी ड्रेन होत असेल, तर त्याचा परिणाम बॅटरीच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे जेव्हा तुमचे वाहन २० टक्क्यांच्या जवळपास असेल तेव्हा ते चार्ज करणे योग्य राहील. गाड्यांच्या बॅटरीवर शून्यापासून चार्ज होण्यासाठी ताण येऊ शकतो. त्यामुळे असे होणार नाही याची काळजी घ्या.

३. वाहन चालविल्यानंतर ताबडतोब बॅटरी चार्ज करू नये

गाडी चालविताना लिथियम आयन बॅटरीज मोटारला पॉवर देताना प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण करतात. त्यामुळे त्यांना ताबडतोब चार्ज करणे धोकादायक असू शकते; तसेच वाहनांमध्ये थर्मल प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. म्हणून बॅटरी साधारण अर्ध्या तासाने किंवा थंड झाल्यानंतरच ती चार्ज करावी.

हेही वाचा : Bike tips : वाहन चोरांपासून सावधान! दुचाकी चोरी होऊ नये म्हणून काय करावे? या उपयुक्त टिप्स पाहा

४. सतत चार्जिंग करू नये

वाहनाची बॅटरी सतत थोड्या-थोड्या वापरानंतर चार्ज करण्याची अनेकांना सवय असते. मात्र, त्यामुळे तुमच्याच वाहनाच्या बॅटरीचे आयुष्य कमी होते. कोणतीही बॅटरी कालांतराने खराब होणार असली तरीही सतत चार्जिंग केल्याने ती गरजेपेक्षा अधिक लवकर खराब होते आणि परिणामत: तिचे आयुष्य लवकर संपते. तसेच त्याचा परिणाम बॅटरीच्या कार्यक्षमतेवरदेखील होतो. त्यामुळे गरज असेल तेव्हाच बॅटरी चार्ज करावी हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे.

आपल्या इलेक्ट्रिक वाहनांची, त्यांच्या बॅटरीची काळजी घेण्यासाठी या चार सोप्या; पण तितक्याच महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा. वरील टिप्सबद्दलची माहिती ही हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखाद्वारे मिळाली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take care of your electric vehicles note down these four tips for how not to charge your ev batteries dha
Show comments