भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही वाहनांचे वर्चस्व वाढत आहे. एवढेच नाही तर मार्च २०२४ मध्ये टॉप-१० सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत ४ कार एसयूव्ही होत्या. यापैकी अनेक एसयूव्ही कारची विक्री बाजारात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या हॅचबॅक कारपेक्षाही अधिक होती. आता लोक ८-१० लाख रुपयांची प्रीमियम हॅचबॅक खरेदी करण्यापेक्षा कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत, असे आकडेवारीवरुन दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार विक्री यादी पाहिल्यास, गेल्या महिन्यात (मार्च २०२४) टाटा पंच मिनी एसयूव्ही विक्रीत प्रथम क्रमांकावर होती. मार्च २०२४ मध्ये या कारच्या एकूण १७,५४७ युनिट्सची विक्री झाली होती, तर गेल्या वर्षी याच महिन्यात १०,८९४ युनिट्सची विक्री झाली होती. पंचने विक्रीत मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या वॅगन आर आणि डिझायर या गाड्यांनाही मागे टाकले आहे. Hyundai Creta विक्रीच्या यादीत १६,४५८ युनिट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे, जी या SUV च्या फेसलिफ्ट मॉडेलसाठी मोठी उपलब्धी आहे. यावेळी मारुती वॅगनआर क्रमांक-१ वरून तिसऱ्या क्रमांकावर घसरली. तथापि, कंपनीने १६,३६८ युनिट्सची विक्री केली. Mahindra Scorpio बद्दल बोलायचे झाले तर, या SUV चे एकूण १५,१५१ युनिट्स विकले गेले आहेत.

(हे ही वाचा : Raider आणि Pulsar ची उडाली झोप, नवीन १२५cc बाईकने देशात दाखल होताच बाजारात उडविली खळबळ )

किंमत किती आहे?

पंचची किंमत ६ लाख रुपयांपासून सुरू होते आणि ९.५२ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. टाटा पंचमध्ये १.२ लीटर ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन ८८ bhp ची कमाल पॉवर आणि ११५ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स तसेच ५-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही आहे. Tata Punch पेट्रोलमध्ये २०.०९ kmpl आणि CNG मध्ये २६.९९ km/kg मायलेज देते.

वैशिष्ट्ये

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, पंचमध्ये ७-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनेल, ऑटो एअर कंडिशनिंग, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, रियर डिफॉगर, रिअर पार्किंग सेन्सर, रियर-व्ह्यू कॅमेरा आणि ISOFIX अँकर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. टाटा पंचला ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये ५-स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळाले आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The tata punch sold 17457 units in march along with the hyundai creta selling 16458 units pdb
First published on: 22-04-2024 at 14:32 IST