शाळकरी वयातच हवामान बदलाच्या प्रश्नासाठी सर्वस्व पणाला लावणारी ग्रेटा थनबर्ग ही पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण- तरुणींची आदर्श आहे. २०१८ मध्ये स्वीडनच्या संसदेच्या बाहेर हवामान बदलाच्या प्रश्नासाठी ‘स्कूल स्ट्राइक’ करत असल्याचा फलक घेऊन बसणारी, या प्रश्नावर काहीही करत नसल्याबद्दल जागतिक पातळीवरच्या नेत्यांना धारदार प्रश्न विचारत जगाचं लक्ष वेधून घेणारी ग्रेटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती स्वीडिश सरकारने तिच्या सन्मानार्थ पोस्टाचा स्पॅम्प प्रसिद्ध केल्यामुळे. स्वीडन सरकारने ‘व्हॅल्यूएबल नेचर’ अर्थात ‘मौल्यवान निसर्ग’ या विषयावर पाच स्पॅम्पची एक मालिका केली असून त्यात ग्रेटालाही स्थान देण्यात आलं आहे. स्वीडनमधल्या निसर्गाच्या जतनीकरणात असलेल्या ग्रेटाच्या योगदानाचा स्वीडन सरकारने अशा पद्धतीने सन्मान केला आहे.

या स्पॅम्पच्या एका चित्रात १८ वर्षाची ग्रेटा एका उंच कड्यावर उभी आहे असं दाखवलं आहे. तिच्या अंगात ग्रेटाचा ट्रेडमार्क ठरलेला पिवळा रेनकोट आहे. तिची वेणी वाऱ्यामुळे उजव्या बाजूला उडते आहे. स्वीडनमधले चित्रकार हेन्निंग ट्रोलबॅक यांनी ही पाचही चित्रं काढली आहेत. या स्टॅम्पची किंमत १२ क्रोनॉर (स्वीडिश चलन) म्हणजेच १.४ डॉलर आहे. १४ जानेवारीपासून हे स्टॅम्प विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा

स्वीडिश सरकारने अलीकडेच पर्यावरणविषयक १६ ध्येयं निश्चित केली आहेत. त्यांचा या स्टॅम्पच्या मालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यात काही महत्त्वाच्या गणल्या गेलेल्या अधिवासांचे जतनीकरण आहे. उंच पर्वतराजी, तिथली वृक्षसंपदा, जंगलं, शेतजमिनी, खारपड जमिनी यापैकी काहींचा समावेश स्टॅम्पवर करण्यात आला आहे. या निसर्गसंपत्तीइतकीच ग्रेटासारखी पर्यावरण रक्षणाचा आग्रह धरणारी तरूण मुलगी आपल्यासाठी महत्त्वाची आहे हेच जणू स्वीडन सरकारने आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे.

जेमतेम १८ वर्षाच्या ग्रेटाला तिच्या छोट्याशा पण लक्षणीय आंदोलनामुळे जगभर प्रसिद्धी मिळाली. तिला संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक परिषदेत भाषण करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. पर्यावरणविषयक नोबेल पारितोषिकासाठी तिचं नामांकन झालं होतं. २०१९ मध्ये टाइम साप्ताहिकाने तिला पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केलं होतं.

आता तिच्या सन्मानार्थ स्टॅम्प वितरित करण्यात आल्यामुळे इतक्या लहान वयात तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अर्थात या सगळ्यापेक्षा ग्रेटा करते ते काम अधिक महत्त्वाचं आहे. ‘स्कूल स्ट्राइक फॉर क्लायमेट’ या तिच्या आंदोलनाने आधी स्वीडनमधल्या आणि नंतर जगभरातल्या तिच्या वयाच्या मुलांना प्रेरणा मिळाली आहे.