राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रमांतर्गत “पर्वतमाला प्रकल्पा”तून पुढील पाच वर्षांसाठी १.२५ लाख कोटी रुपये खर्चाचे २०० हून अधिक प्रकल्प राबवले जाणार आहेत, असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. मंगळवारी नवी दिल्ली येथे रोपवेवरील परिसंवादाच्या कार्यक्रमा (Symposium-Cum-Exhibition)ला नितीन गडकरी यांनी संबोधित केलेय. “रोपवे नेटवर्क विकसित करण्यासाठी आणि देशातील सार्वजनिक-खासगी भागीदारी सुलभ करण्यासाठी एकूण प्रकल्प खर्च कमी करून रोपवे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. देशातील सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी)ला प्रोत्साहन दिले पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गडकरी म्हणाले की, डोंगराळ भागात पर्यटनाची सोय उपलब्ध करून देण्याबरोबरच रोपवे शहरी सार्वजनिक वाहतुकीतही मोठी क्षमता प्रदान करतो. सुरक्षेशी तडजोड न करता स्वदेशी आणि किफायतशीर उपाय विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

हेही वाचाः शेअर बाजारात पुन्हा भूकंप; सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळला, अवघ्या ३ तासांत गुंतवणूकदारांचे १.७७ लाख कोटींचे नुकसान

गडकरी पुढे म्हणाले की, रोपवेमध्ये देशातील पर्यटन आणि रोजगार निर्मितीवर सकारात्मक प्रभाव टाकण्याची अफाट क्षमता आहे. आता फोकस हा कालबद्ध रचना, कार्यक्षम खर्च आणि टिकाऊ पायाभूत सुविधांच्या विकासावर आहे.’जागतिक दर्जाच्या’ पायाभूत सुविधांच्या निर्मितीमुळे नागरिकांचा ‘जीवन सुलभता’ आणि सामाजिक-आर्थिक विकास सुनिश्चित होतो. गडकरी म्हणाले की, “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत रोपवे घटकांच्या निर्मितीला प्रोत्साहन देऊन विद्यमान धोरणे आणि संहिता यांचे मानकीकरण करणे आणि रोपवे उद्योगात परिवर्तन घडवून आणणे याला आमचं प्राधान्य आहे.

हेही वाचाः विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजींचं मुलांना कोट्यवधींचं गिफ्ट; नावावर केले ५०० कोटींचे शेअर्स!

विविध भारतीय आणि जागतिक उत्पादक, तंत्रज्ञान सेवा पुरवणारे, सवलती देणारे आणि पायाभूत सुविधा विकासक यांच्यातील उद्योग सहयोग सक्षम करणे हा ‘सिम्पोजियम-सह-प्रदर्शन’ कार्यक्रमाचा उद्देश होता. खरं तर हा कार्यक्रम ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्याबरोबरच उद्योग चर्चांसाठी एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देतो. रोपवे घटकांच्या स्थानिकीकरणासाठी रोडमॅप विकसित करावा लागणार असल्याचंही नितीन गडकरींनी अधोरेखित केले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 200 ropeway projects worth 1 25 lakh crore in 5 years says nitin gadkari vrd
Show comments