Premium

विकास दरात दुसऱ्या तिमाहीतही वाढीचे अनुमान, आज अधिकृत आकडेवारीची घोषणा

बहुतांश अर्थतज्ज्ञांनी विकास दर ६.७ टक्के ते ७ टक्के यादरम्यान राहण्याचे कयास व्यक्त केले आहेत.

Gross Domestic Product (GDP), growth rate , July, September
विकास दरात दुसऱ्या तिमाहीतही वाढीचे अनुमान, आज अधिकृत आकडेवारीची घोषणा

पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग कायम असून, आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीतही विकास दर चांगलाच असेल, असा अंदाज केंद्रीय आर्थिक कामकाज सचिव अजय सेठ यांनी बुधवारी व्यक्त केला.

जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील सकल देशांतर्गत उत्पादनाची (जीडीपी) आकडेवारी गुरुवारी (३० नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. बहुतांश अर्थतज्ज्ञांनी विकास दर ६.७ टक्के ते ७ टक्के यादरम्यान राहण्याचे कयास व्यक्त केले आहेत. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत विकास दर ७.८ टक्के नोंदविण्यात आला आहे. वाढीचा हा वेग दुसऱ्या तिमाहीत कायम राहील, असे नमूद करीत सेठ म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात वित्तीय तुटीचे उद्दिष्ट ५.९ टक्के आहे. अन्नधान्य अनुदानावर अतिरिक्त निधी खर्च होणार असला तरी हे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे.

हेही वाचा… ‘इरेडा’च्या शेअरचे पुढे करावे काय? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत, ‘इरेडा’च्या भागधारकांना पहिल्याच दिवशी ८७ टक्क्यांचा लाभ

हेही वाचा… मुंबई शेअर बाजाराचा ऐतिहासिक टप्पा, बाजार भांडवल ४ लाख कोटी डॉलरपुढे

केंद्र सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट जीडीपीच्या ५.९ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या ६.४ टक्के होती. सरकारने वित्तीय तूट आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंत जीडीपीच्या ४.५ टक्क्यांवर आणण्याचे निश्चित केले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Official data announced about latest gdp soon print eco news asj

First published on: 30-11-2023 at 13:19 IST
Next Story
‘इरेडा’च्या शेअरचे पुढे करावे काय? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत, ‘इरेडा’च्या भागधारकांना पहिल्याच दिवशी ८७ टक्क्यांचा लाभ