Premium

व्याजदर स्थिर राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या द्वैमासिक बैठकीस सुरूवात

पततधोरण बैठक तीन दिवस चालणार आहे. मागील पतधोरण बैठकीत रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले होते.

Reserve Bank of India
देशातील ही १२ राज्ये कर्ज घेण्यात अव्वल, राज्यांच्या एकूण कर्जापैकी ३५ टक्के कर्ज त्यांच्यावर

पीटीआय, मुंबई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या द्वैमासिक बैठकीला बुधवारी सुरूवात झाली. विकास दराची वाढीचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि महागाई नियंत्रणात राखण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कोणतेही बदल केले जाणार नाहीत, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास बैठकीतील निर्णयांची घोषणा ८ डिसेंबरला करतील.

पततधोरण बैठक तीन दिवस चालणार आहे. मागील पतधोरण बैठकीत रिझर्व्ह बँकेने व्याजदर स्थिर ठेवले होते. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी महिन्यातील पतधोरणात व्याजदर वाढवून ६.५ टक्क्यांवर नेले होते. हे व्याजदर वाढीचे चक्र मे २०२२ पासून सुरू झाले होते. फेब्रुवारीनंतर व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रशिया – युक्रेन युद्ध आणि जागतिक पातळीवर पुरवठा साखळीत उलथापालथ झाल्याने वाढलेली महागाई यामुळे व्याजदरात त्यावेळी वाढ करण्यात आली होती.

हेही वाचा… देशातील ७५ जिल्हे बनणार निर्यात केंद्र

डॉईश बँक रिसर्चच्या अंदाजानुसार, रिझर्व्ह बँकेककडून सकल देशांतर्गत उत्पादनाचा (जीडीपी) चालू आर्थिक वर्षासाठीचा अंदाज वाढवून ६.८ टक्क्यांवर नेला जाण्याची शक्यता आहे. आधी हा अंदाज ६.५ टक्के होता. याचबरोबर चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई दराचा अंदाज ५.४ टक्क्यांवर कायम ठेवला जाईल. रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर स्थिर ठेवला जाईल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rbi may keep interest rates steady print eco news asj

First published on: 07-12-2023 at 11:25 IST
Next Story
देशातील ७५ जिल्हे बनणार निर्यात केंद्र