लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबईः वीज वितरण आणि पारेषणासाठी आवश्यक सुट्या घटकांची उत्पादक असलेल्या विलास ट्रान्सकोअरची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या २७ मे ते २९ मे या दरम्यान गुंतवणुकीसाठी खुली होत असून, त्यायोगे ९५.२६ कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘एनएसई इमर्ज’ या एसएमई मंचावर सूचिबद्धतेसाठी असलेल्या समभाग विक्रीसाठी गुंतवणूकदारांना प्रत्येकी १३९ ते १४७ रुपये या दरम्यान समभागांसाठी बोली लावता येईल. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १,००० समभागांसाठी बोली लावणारा अर्ज करता येईल, ज्याचे मूल्य १.४७ लाख रुपये असेल. हेम सिक्युरिटीज लिमिटेड ही कंपनी या आयपीओचे व्यवस्थापन पाहत आहे.

हेही वाचा >>>रिझर्व्ह बँकेचा केंद्राच्या तिजोरीला हातभार; आजवरचा सर्वाधिक २.११ लाख कोटींचा लाभांश मंजूर

समभाग विक्रीतून उभ्या राहणाऱ्या रकमेपैकी ५ कोटी रुपये धोरणात्मक गुंतवणूक आणि अधिग्रहणासाठी आणि २०.१ कोटी रुपये नवीन इमारतीच्या बांधकामासाठी, तर आणखी ४५.२ कोटी रुपये दुसऱ्या एका उत्पादन सुविधेच्या अधिग्रहण आणि तेथे यंत्रसामग्री स्थापित करण्यासाठी ही कंपनी खर्च करणार आहे. बडोद्यात सध्या दोन उत्पादन सुविधांनिशी कार्यरत विलास ट्रान्सकोअर ही कंपनी अभियांत्रिकी उद्योग क्षेत्राच्या गरजा तिच्या ग्राहकांच्या मागणीनुसार पूर्ण करते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vilas transcore sme ipo is open for investment from may 27 print eco news amy