गेल्या वर्षी अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने आजच्याच दिवशी अदाणी समूहावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अदाणी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सवरही त्याचा गंभीर परिमाण झाला होता. आता हिंडेनबर्गच्या आरोपांना वर्ष उलटलं असून, त्या निमित्तानं अदाणी समूहानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. ”न भूतो न भविष्यती असा हल्ला,” असल्याचं सांगत हिंडेनबर्गच्या आरोपांवर अदाणी समूहाने खुलं पत्र लिहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रात अदाणी लिहितात की, ”बरोबर एका वर्षापूर्वी २५ जानेवारी २०२३ हाच तो दिवस होता, जेव्हा बातमी आली की, न्यूयॉर्कमधील एका शॉर्ट सेलरने अदाणी समूहावर झालेल्या आरोपांचे संकलन जगासमोर ऑनलाइन पद्धतीने खुले केले. ‘संशोधन अहवाल’ म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेल्या त्या तथाकथित अहवालात तेच ते जुने आरोप होते. चावून चोथा झालेले तेच जुने आरोप होते, जे माझे विरोधक त्यांच्या माध्यमातील सहकाऱ्यांना हाताशी धरून त्याला संजीवनी देण्याचा प्रयत्न करीत होते. एकंदरीत आम्ही स्वतःच जाहीर केलेल्या आणि सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या माहितीमधून निवडक अर्धसत्यांचा धूर्तपणे वापर करून हा तथाकथित संशोधन अहवाल तयार करण्यात आला होता.”

हेही वाचाः Union Budget 2024 : हलवा समारंभ संपन्न, दरवर्षी का साजरी केली जाते ही परंपरा?

पुढे ते लिहितात, ”आमच्यावर खोटे आणि निराधार आरोप काही नवीन नव्हते. म्हणून सर्वसमावेशक प्रतिसाद जारी केल्यानंतर मी याबद्दल अधिक विचार केला नाही. माझ्यासारख्या सत्याच्या ताकदीवर गाढ विश्वास असणाऱ्याला हा असत्याच्या शक्तीचा हा एक धडा होता. विविध राजकीय पक्षांद्वारे शासित २३ राज्यांमध्ये आमचा पायाभूत सुविधांचा व्यवसाय पसरलेला असून, तेथील राजकारणाशी आमचा काहीही संबंध नाही. गेल्या वर्षभरातील कसोटीचा प्रसंग आणि संकटांनी आम्हाला मौल्यवान धडे दिलेत, त्यांनी आम्हाला मजबूत केले आणि भारतीय संस्थांवरील आमचा विश्वास पुन्हा दृढ केला आहे. आमच्यावरचा हा कुटिल हल्ला आणि आमचा जोरदार प्रतिकार हे निःसंशयपणे केस स्टडी बनतील, तरीही मी काय शिकलो हे सर्वांसमोर मांडणे भाग आहे, कारण आज आम्ही लक्ष्य होतो, उद्या कोणी इतर असू शकते. अशा हल्ल्यांचा हा शेवट आहे, या भ्रमात मी नाही. मला विश्वास आहे की, आम्ही या अनुभवातून आणखी मजबूत झालो आहोत आणि भारताच्या विकासात आमचे योगदान चालू ठेवण्याच्या आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे”, असंही अदाणी समूहानं अधोरेखित केलं आहे.

हेही वाचाः ५ वर्षांत १.२५ लाख कोटींचे २०० रोपवे प्रकल्प; नितीन गडकरींचं पर्वतोड्डाण

”ज्यांनी आमच्यावर हल्ला केला, त्यांच्या हेतूंचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही वस्तुस्थिती पारदर्शकपणे मांडण्यावर आणि आमची बाजू कथन करण्यावर लक्ष केंद्रित केले. यामुळे आमच्या समूहाविरुद्धच्या नकारात्मक मोहिमांचा प्रभाव कमी होत गेला. या संकटाने आमच्या समूहातील एक मूलभूत कमकुवत दुवा उघड केला, ज्याच्याकडे मी दुर्लक्ष केले होते. आम्ही आमच्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या यंत्रणेकडे पुरेसे लक्ष दिले नव्हते. आमची आर्थिक स्थिती मजबूत आहे, आमची प्रशासकीय प्रणाली निर्दोष आहे, आमचा विकासाचा रोडमॅप योग्य आहे आणि भारतातील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावतोय, यावर आमचा पूर्णपणे विश्वास होता”, असंही अदाणी समूहाने पत्राच्या माध्यमातून सांगितले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Year after the hindenburg allegations an open letter from the adani group vrd
Show comments