लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा आजपासून सुरू होत आहे. देशात लोकसभा निवडणुका होत असताना दुसरीकडे इस्रायल-इराण युद्धाचे पडसाद भारतीय शेअर बाजावरही उमटले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीची आज सकाळची सुरुवात पडझडीने झाली. बाजार सुरू होताच सेन्सेक्स ७१,९०० च्या खाली तर निफ्टी २१,९०० च्या खाली आला. बाजारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचेही चित्र दिसले. निफ्टीमध्ये कोणत्याही क्षेत्राचा इंडेक्स आज हिरवा नाही. तर बीएसईमध्ये लिस्टेड असलेल्या कंपन्यांचे बाजारातील भांडवल सकाळी बाजार खुलताच ३.७१ लाख कोटींनी कमी झाल्याचे दिसले.

सकाळी बाजार उघडल्या नंतर बीएसई सेन्सेक्समध्ये ६०८.५० अंकाची (०.८४ टक्के) घसरण दिसली. तर अर्ध्या तासानंतर म्हणजे १० वाजण्याच्या सुमारास यात थोडी सुधारणा होऊन घसरण ३५० अंकापर्यंत (०.४८ टक्के) आली. तर निफ्टीमध्ये सकाळी बाजार उघडल्यानंतर १८२ अकांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे निफ्टी निर्देशांक २२ हजारांच्या खाली आला. १० वाजण्याच्या सुमारस यात थोडी सुधारणा होऊन निफ्टी निर्देशांक २१,८७७ वर स्थिरावला.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock market live updates sensex and nifty makes gap down start kvg
First published on: 19-04-2024 at 10:01 IST