प्रत्येक करदात्याने योग्य प्राप्तिकर विवरणपत्र निवडावे ही प्राप्तिकर विभागाची अपेक्षा आहे व त्याप्रमाणे कार्यवाही करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सर्व करदात्यांना ‘सहज’च प्राप्तिकर विवरणपत्र भरावे वाटते कारण ते भरणे फार सोपे आहे, त्यात क्लिष्टता नाही, माहितीचा फाफटपसारा नाही, आटोपशीर उत्पन्नाची व वजावटीची माहिती द्यावी लागत असल्याने करदात्याना आपलेसे वाटते. जरी या विवरणपत्रात बदल झाले नसले तरी करदात्याना गतवर्षीची माहिती लक्षात राहत नसल्याने त्यामुळे त्याची उजळणी होणे आवश्यक असते. ३१ मार्च २०२३ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाकरिता आता हे विवरण पत्र आता केवळ पगारदार, निवृत्ती वेतन, एक घराची मालकी संयुक्त असणाऱ्याही, इतर मिळकती मार्फत उत्पन्नाचा स्रोत असणाऱ्याना पन्नास लाख रुपयांपर्यंत एकूण ‘ढोबळ उत्पन्न’ असणाऱ्या ‘निवासी व सामान्य निवासी’ असणाऱ्या व्यक्तीस भरता येईल. याचा अर्थ ‘केवळ हेच’ विवरणपत्र सोपे आहे म्हणून भरावे असा नसून करदात्याच्या इच्छेनुसार तो १, २, किंवा ४ पैकी कोणतेही विवरणपत्र भरू शकतो. यंदाच्या अर्थसंकल्पात झालेल्या बदलानुसार जुळे विवरण पत्र मानल्या जाणाऱ्या सुगम विवरणपत्राची कमाल मर्यादा बौद्धिक व्यवसायाकरीता रु ५० लाखांवरून रु ७५ लाख तर गृहीत उत्पन्न व्यवसायासाठी दोन कोटी रुपयांवरून तीन कोटी रुपये करण्यात आली आहे. तथापि हा बदल पुढील वर्षाचे विवरणपत्र भरण्यासाठी आहे. असा बदल या सहज विवरणपत्रासाठी केलेला नाही हे लक्षात घ्यायला हवे.

आणखी वाचा: Money Mantra: आयुर्विमा पॉलिसी कराराचं महत्त्व

A case has been registered against the girlfriend who killed her boyfriend Nagpur crime news
प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीवर गुन्हा दाखल; हुडकेश्वर पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
loksatta ulta chasma
उलटा चष्मा: होऊ द्या ध्वनिप्रदूषण!
Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
Pune, Doctor Cheated, rs 5 crore, religious settlement Scam , case registered against 5 persons, Pune Doctor Cheated rs 5 crore, religious settlement Doctor Cheated,
स्वर्गप्राप्तीच्या आमिषाने डॉक्टरची पाच कोटींची फसवणूक

हे विवरण पत्र लोकप्रिय का आहे?
यंदाच्या वर्षी केंद्रीय मध्यवर्ती प्रत्यक्ष कर मंडळाने घोषित केलेल्या आयटीआर १ (सहज) या प्राप्तिकर विवरणपत्र भरताना त्रास न देणारे व पात्र करदातावर्गात प्राप्तिकर विभागातर्फे उत्पन्नाची जवळ जवळ छाननी न होणारे म्हणून सर्वात लोकप्रिय असणाऱ्या या प्राप्तीकर विवरणपत्रात फारसे महत्वाचे बदल केले नसून त्यातील माहिती आता पूर्वी प्रमाणेच केवळ काटेकोरपणेच नव्हे तर विस्तारपूर्वक देणे आता बंधनकारक झाले आहे. हे प्राप्तिकर विवरण पत्र भरल्यास अधिक भरलेल्या प्राप्तिकराची रिफंड रक्कम अतिशय त्वरीत मिळते ही या विवरणपत्राची खासियत आहे. काही करदात्याना रिफंडची रक्कम अतिशय जलद म्हणजे काही तासात मिळाली आहे यातच प्राप्तीकर विमागाची कार्यक्षमता व त्यामुळे होणारे करदात्यांचे संतोशाधीक्य सामावले आहे. म्हणून करदाते हे विवरणपत्र भरण्यास उत्सुक असतात.

आणखी वाचा: Money Mantra : कर वाचवण्यासाठी पालकांना भाडे देता येते का? नियम काय सांगतो?

एका घराची मालकी संयुक्त नसणाऱ्या करदात्यासाठी असणारा मज्जाव मागे
एका घराची मालकी संयुक्त नसणाऱ्या करदात्याना हे विवरणपत्र दाखल करण्यास मज्जाव करण्यात आला होता ते थोडेसे अन्यायकरकच होते कारण सध्या मध्यमवर्गीय स्वतःच्या कुटुंबांसंदर्भात सजग झाला असून घर खरेदी करताना आपल्या सहचऱ्याचे नाव त्यात समाविष्ट करीत आहे. याखेरीज परवडणारी घरे विकत घेताना दुर्बल घटकांना महिलेचे नाव समविष्ट करण्याची केंद्र सरकारनेच सक्ती केली आहे तर महिलांचे नावाने कर्ज काढल्यास व्याजदर देखील कमी द्यावा लागतो ही वस्तुस्थिती आहे. सबब घरातील दोन प्रमुख व्यक्तींच्या नावाने घर खरेदी होते हे वास्तव आहे म्हणून या बदलामुळे त्यांच्यावर अन्याय होणार होता. त्याची लगेचच माहिती घेऊन ही अट मागे घेण्यात आली होती. त्यामुळे एका घराचे संयुक्त मालकीहक्क असताना देखील हे विवरणपत्र दाखल करता येईल असे स्पष्ट झाले आहे. आता हे विवरणपत्र भरताना पगारदार व्यक्तीस ज्याच्या कडे नोकरी करीत आहे त्याचा पॅन द्यावा लागणार आहे. जर घर भाड्याने दिले असेल तर भाडेकऱ्याचे नाव, त्याचा आधार क्रमांक व पॅन देणे जे ऐच्छिक होते ते आता पूर्णपणे देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्वी नावापुढे ‘संजय ’ व पत्त्याच्या जागी ‘पुणे’ असे लिहिले तरी चालत होते. घराचा ‘पूर्ण पत्ता’ जरी करदाता तेथे राहत नसला तरे देणे आवश्यक झाले आहे, जर करदात्याकडे पासपोर्ट असल्यास त्याचा नंबर ‘परदेशी प्रवास न झाल्यासही’ देणे आवश्यक झाले आहे.

सहज विवरण पत्र कोणाला दाखल करता येणार नाही?
ज्या करदात्यांने २०२२-२३ या आर्थिक वर्षात
१. एक लाख रुपयांपेक्षा अधिक रककम वीज बिलापोटी भरली असेल किंवा
२. बँकेत किंवा सहकारी बँकेत एक किंवा अधिक खात्यात मिळून एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम धनादेश वा रोख स्वरूपात जमा केली असेल. किंवा तथापि, यंदाच्या वर्षी ही अट शिथील करण्यात आली आहे.
३. घराची मालकी एकापेक्षां अधिक व्यक्तींच्या नावे असल्यास किवा
४.स्वतः किंवा इतरांच्या विदेशी प्रवासासाठी रु. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असल्यास किंवा
५. शेतीपासून मिळणारे करमुक्त उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असेल (ही मर्यादा इतर करमुक्त उत्पन्नासाठी नाही) किंवा
६. जर करदाता कंपनीचा संचालक असल्यास किंवा
७. उत्पन्न वर्षाच्या दरम्यान कधीही कोणत्याही दिवशी असूचीबद्ध इक्विटी समभागामध्ये गुंतवणूक असल्यास किंवा
८. भारताबाहेर स्थित कोणतीही मालमत्ता (कोणत्याही संस्थेमध्ये आर्थिक व्याज समाविष्ट) असल्यास;.किंवा
९. परदेशात स्थित असणाऱ्या कोणत्याही खात्यात स्वाक्षरी अधिकार असल्यास; किंवा
१०. परदेशातून कोणत्याही स्रोतांकडून काही उत्पन्न आले असेल तर किंवा
११. करदात्याने लॉटरी वा घोड्यांच्या शर्यतीत उत्पन्न मिळविले असेल किंवा
१२. अल्पकालीन वा दीर्घ कालीन भांडवली नफा मिळाला असल्यास किंवा फ्युचर अथवा प्शांस
१३. विदेशी कर सवलत मिळणार असेल, किंवा
१४. निर्दिष्ट उत्पन्नावर विशेष दराने प्राप्तीकर आकारला जाणार असेल किंवा
१५. करदाता सामान्य निवासी नसणारा’’ किंवा ‘अनिवासी’ असेल तर किंवा
१६, व्यक्ती व हिंदू अविभक्त कुटुंब पद्धती सोडून इतर करदाते
१७. बौद्धीकी किंवा धंद्यात उलाढाल करून व्यवसायातून उत्पन्न मिळविले असेल किंवा
१८. जर ढोबळ उत्पन्न रु. पन्नास लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर हे विवरणपत्र भरता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे

सहज आयटीआर हा ऑनलाईन तसंच ऑफलाईनही भरता येतो
या विवरण पत्रात करमुक्त लाभांशाची रक्कम फक्त विषद करावयाची आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. जर वरील माहिती दिली नाही तर सदर विवरणपत्र सदोष प्राप्तीकर विवरण पत्र म्हणून प्राप्तीकर विभाग कलम १३९(९) अंतर्गत घोषित करू शकतील त्यामुळे रिफंड न मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून विशेष काळजी घेण्याची जरुरी आहे. दोष ठराविक कालावधीत दुरुस्त झाला नाही तर विवरणपत्र अवैध मानले जाऊ शकते हे त्यात महत्वाचे ! सबब सतर्कता बाळगणे आवशयक आहे. ज्या पगारदार व अन्य करदाते आयटीआर १ (सहज) भरण्यास पात्र नसतील त्यांनी आयटीआर २ भरावयाचा आहे. सहज आयटीआर हा ऑन वा ऑफ लाईन भरता येतो

स्थानिक स्वराज्य संस्थाना प्रत्यक्ष भरणा केलेला त्याच वर्षाचा मालमत्ताकर, कर्जावरील व्याज व घराच्या उत्पन्नावर मिळणारी ३०% प्रमाणित वजावट विषद करून दाखवावी लागणार आहे. घरापासून मिळणाऱ्या उत्पन्नाऐवजी नुकसान होत असेल व ते पुढील वर्षाकरीता ओढायचे असेल तर या विवरणपत्राचा वापर करता येणार नाही परंतु २०२२-२३ आर्थिक वर्षाचे गृहकर्ज व्याजामुळे होणारे संपूर्ण नुकसान जर रु. दोन लाख पर्यंत असेल व ते इतर उत्पन्नातून वजा होऊ शकत असेल तरच हे विवरणपत्र भरता येईल. थोडक्यात घराकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याज देण्याने होणारे नुकसान म्हणजे ‘उणे उत्पन्न रक्कम’ या विवरण पत्रात दाखविता येईल हे महत्वाचे. !