मुंबईच्या रस्त्यावरील वाढणारी वाहतूक आणि सततची बांधकामे यांमुळे हवेतील प्रदूषणात धोक्याच्या पातळीपेक्षा दुपटीने वाढ. मुंबई प्रदूषण नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार गेल्या महिन्याभरात हवेतील नायट्रोजन ऑक्साइडच्या मात्रेत वाढ’.    
    (१२ फेब्रुवारी २०१३).
‘जगभरातील संशोधकांच्या पाहणी अहवालानुसार वाहनांमुळे होणाऱ्या हवेतील प्रदूषणाचा परिणाम अर्भकांचे जन्मवेळचे वजन घटण्यात होतो’.
    (फेब्रु. ७ फेब्रुवारी २०१३)
‘सौराष्ट्रातील अमरेली तालुक्यातील धातारवडी धरण परिसरात २० पक्ष्यांचा मृत्यू, जामनगरमधील लाखोटा तलावात प्रदूषित पाण्यामुळे ४० पक्ष्यांचा मृत्यू.’
    (१७ फेब्रुवारी २०१३)
‘लखनौ येथे भरलेल्या दहाव्या शेतकी विज्ञान परिषदेत संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी एकूणच शेतीखालील जमिनीचा कस कमी झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. तसेच याचा दूरगामी परिणाम अन्नधान्य उत्पादनावर होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.’    (फेब्रु. २०११)
वाचकहो, अग्रगण्य वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या वरील बातम्यांवरून पर्यावरणातील विविध घटकांचा समतोल सजीवांच्या सुदृढ, नसíगक वाढीसाठी किती आवश्यक आहे, हे आपल्या सहज लक्षात येते. खरंतर ‘पर्यावरण’, ‘इको फ्रेंडली’, ‘प्रोटेक्शन ऑफ मदर अर्थ’ वगरे शब्द आपल्यापकी प्रत्येकाच्या बोलण्यात व वाचनात सतत येत असतात. आजकाल शालेय अभ्यासक्रमांतूनही ‘पर्यावरण’ हा विषय अंतर्भूत असतो. याचाच अर्थ सर्वच जण पर्यावरण विषयाबद्दल चांगलेच जागरूक असतात, पण जेव्हा करिअर क्षेत्र निवडण्याची वेळ येते तेव्हा मात्र पर्यावरणासंबंधी शिक्षणक्रमांना आपण म्हणावे तितके प्राधान्य देत नाही. कदाचित ह्या क्षेत्रातील शिक्षणक्रमांची, रोजगारसंधींबाबतची अनभिज्ञता हे यामागचे मूळ कारण असावे. हेच सत्य विशद करणारी आणखी एक बातमी-
‘नागपूरच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ महाविद्यालयातील पर्यावरण विज्ञान विभागात ठरावीक विषय शिकवण्यासाठी योग्य शिक्षक उपलब्ध नसल्याने संस्थेच्या माजी यशस्वी विद्यार्थ्यांना प्रायोगिक तत्त्वावर शिक्षक म्हणून नेमण्यात आले, या अभिनव प्रयोगाला राज्य सरकारची मान्यता मिळावी यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.’ (२५ जाने. २०१३)
पर्यावरण विषयाचे शिक्षणक्रम तुमच्यासाठी खालीलप्रमाणे आहोत :
एन्व्हॉयर्नमेन्ट इंजिनीअरिंग :
याअंतर्गत पर्यावरणातील विविध घटकांचा अभ्यास, संवर्धन आणि संरक्षण यासाठी अभियांत्रिकी शिक्षणातील संकल्पनांचा वापर केला जातो. ध्वनिप्रदूषण, रासायनिक द्रव्ये, वाहनांमुळे होणारे वायुप्रदूषण, तसेच ग्लोबल वाìमग, अ‍ॅसिड रेन, ओझोन वायुपटलातील बदल यांचा पर्यावरणावरील परिणाम, इतकेच नव्हे तर वन संरक्षण याही विषयांचा अंतर्भाव होतो.
हे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना एनर्जी इंडस्ट्री, केमिकल इंडस्ट्री, कन्सल्टिंग इंजिनीअरिंग फम्र्स, पब्लिक हेल्थ ऑर्गनायझेशन, टेिस्टग लॅबोरेटरीज, प्रायव्हेट रिसर्च फम्र्स, म्युनिसिपल कॉर्पोरेशन या क्षेत्रांतून नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात.
एम.ई. एन्व्हायर्नमेन्ट मॅनेजमेंट :
अर्हता- बी.ई./बी.टेक. (६०% गुणांसह), कालावधी- २ वष्रे, अन्ना युनिव्हर्सटिी ,चेन्नई, तामिळनाडू.
शिक्षणाव्यतिरिक्त गणित, विज्ञान, पर्यावरण विषयांमधील आवड, ताíकक, विश्लेषणात्मक दृष्टिकोन आणि निर्णय क्षमता या गुणांचीही गरज असते.
हे शिक्षण घेतलेल्या व्यक्ती एन्व्हॉयर्नमेन्ट इंजिनीअर म्हणून ओळखल्या जातात. असे उमेदवार खासगी क्षेत्रात केमिकल, मॅन्युफॅक्चिरग, कापड उत्पादन उद्योग तसेच पर्यावरण विषयातील संशोधन, महाविद्यालयातून प्रशिक्षक म्हणून; तसेच पर्यावरण, शेतकी, वनखाते अशा सरकारी विभागांतून नोकरी मिळवू शकतात.
एम.ई. हायड्रोलिक्स अ‍ॅण्ड फ्लड इंजिनीअरिंग
अर्हता- बी.ई./बी.टेक., कालावधी- दोन वष्रे,  एस. पी. कॉलेज, मुंबई, दिल्ली युनिव्हर्सटिी, दिल्ली.
एम. फिल (एन्व्हायर्नमेंटल टेक्नोलॉजी)
अर्हता- बी.ई./बी.टेक., कालावधी- एक वर्ष, पॉन्डिचेरी युनिव्हर्सटि, पुद्दुचेरी.   
एम. टेक बिल्ट एन्व्हायर्नमेंट :
अर्हता- बी.ई./बी.टेक. (५०% गुण), कालावधी- २ वष्रे, युनिव्हर्सटि ऑफ पेट्रोलिअम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीज डेहराडून, उत्तराखंड.
एम.टेक. एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट :
अर्हता- बी.ई./बी.टेक. (५०% गुण) कालावधी- दोन वष्रे, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकेला, ओरिसा, पॉन्डिचेरी युनिव्हर्सटि, पुद्दुचेरी.
पीएच.डी. ग्रीन टेक्नोलॉजी :
अर्हता- एम.ई./एम. टेक. कालावधी- तीन वष्रे, युनिव्हर्सटि ऑफ मुंबई, मुंबई.
पीएच.डी. मिनरल प्रोसेसिंग :
अर्हता- एम.ई./एम. टेक. कालावधी- तीन वष्रे, कर्नाटक युनिव्हर्सटि, गुलबर्गा, कर्नाटक.
डिप्लोमा कोस्रेस इन एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग :
अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन फायर सेफ्टी अ‍ॅण्ड इंडस्ट्रिअल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग
अर्हता- बी.ई./डिप्लोमा इन फायर सíव्हस इंजिनीअरिंग, कालावधी- एक वर्ष, डॉ. आर. जी. भोयर इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी, वर्धा, नागपूर.
डिप्लोमा इन हेल्थ, सेफ्टी, एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग :
अर्हता- बारावी पास, कालावधी- एक वर्ष, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फायर  इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट, उदयपूर, राजस्थान.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हेल्थ, सेफ्टी, एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग :
अर्हता- बी.ई, कालावधी- एक वर्ष, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फायर इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड सेफ्टी मॅनेजमेन्ट, राजस्थान.
एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेन्ट अभ्यासक्रम :
या शिक्षणक्रमाअंतर्गत पर्यावरणानुकूल धोरणांची आखणी व त्यांची अंमलबजावणी. पर्यावरणावरील दुष्परिणामांची कारणे व उपाययोजना. औद्योगिक आस्थापने, कारखाने यांतून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या व्यवस्थापनातील तरतुदी, वेळोवेळी पर्यावरणविषयक कायदे व अटी याबद्दल जागरूक राहून मार्गदर्शन. पुढील विषय हाताळले जातात-
नोकरीच्या संधी
ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट्स, पर्यावरण सल्लागार, रिसर्च फम्र्स, बायोवेस्ट प्लान्ट्स, न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर प्लांट, थर्मल पॉवर प्लान्ट, कोणत्याही उद्योगाचा पर्यावरण सुरक्षा विभाग, स्वयंसेवी संस्था.
या क्षेत्रातील शिक्षणक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तींच्या खालील पदांसाठी नेमणुका होऊ शकतात-
एन्व्हायर्नमेंटल रिसर्च मॅनेजर, एन्व्हायर्नमेंटल प्लानर, एन्व्हायर्नमेंटल को-ऑर्डिनेटर, एन्व्हायर्नमेंटल कन्सल्टंन्ट, एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम स्पेशालिस्ट.
बॅचलर ऑफ हेल्थ, सेफ्टी, एन्व्हायर्नमेंट :
अर्हता- बारावी पास, कालावधी- तीन वष्रे, इन्स्टिटय़ूट ऑफ फायर अ‍ॅण्ड सेफ्टी इंजिनीअरिंग, नागपूर.
एम.बी.ए. एनर्जी अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट :
अर्हता- कोणत्याही विज्ञान शाखेचा पदवीधर, बी.ई./बी.ई. (आर्क), ५०% गुण, कालावधी- एक वर्ष, सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सटिी, सिम्बोयसिस इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस.
या शिक्षणक्रमाअंतर्गत विविध प्रकारच्या ऊर्जानिर्मिती उद्योगातील प्रकियांचा पर्यावरणावरील परिणाम, पर्यावरण अनुकूल पद्धतींचा वापर हे विषय प्रामुख्याने अभ्यासले जातात. या प्रकारचे शिक्षण घेतलेले उमेदवार तंत्रज्ञान, व्यापार आणि पर्यावरण यांच्यातील दुवा बनण्याचे काम करतात.
हा शिक्षणक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी संशोधन आणि विकास क्षेत्रात सल्लागार, स्थानिक पातळीवरील सरकारी पर्यावरण विभाग, मोठमोठय़ा औद्योगिक संस्था किंवा सल्लागार म्हणून वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना पर्यावरणविषयक मार्गदर्शन करून स्वयंरोजगारही मिळवू शकतात. सरकारी संस्था, खासगी उद्योग क्षेत्र, मुख्यत्वे ऊर्जा प्रकल्प (सौर, वायू, समुद्री लाटा), बायोमास, अणुऊर्जा, भूऔष्णिक ऊर्जा उद्योगातून आकर्षक करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात.
यांच्या खालील पदांवर नेमणुका होऊ शकतात-
एनर्जी अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट कन्टेन्ट रायटर, रिसर्च अ‍ॅनालिस्ट, एन्व्हायर्नमेंट ऑफिसर,
हेल्थ, सेफ्टी, एन्व्हायर्नमेंट मॅनेजर.
पीएच.डी. (एन्व्हायर्नमेंट मॅनेजमेन्ट) :
कालावधी- तीन वष्रे, एस.आय.ई.एस. कॉलेज, नेरुळ, मुंबई, यशवंतराव मोहिते कॉलेज, पुणे.
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडस्ट्रिअल सेफ्टी अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेन्ट
अर्हता- पदवीधर, कालावधी- दोन वष्रे, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग, मुंबई.
एन्व्हायर्नमेंटल सायन्स कोस्रेस :
याअंतर्गत प्रदूषणनियंत्रण, औद्योगिक आस्थापनांमधील सुरक्षा, किरणोत्सर्जनाचे परिणाम आणि नियंत्रण, कारखान्यांतून निचरा होणाऱ्या अपायकारक घन, द्रव पदार्थाचा पर्यावरणावरील परिणाम, पर्यायी ऊर्जास्रोतांचा शोध, पाणीपुरवठा व पाण्याचे नियोजन आदी विषयांचा अभ्यास जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांच्या आधाराने केला जातो.
नोकऱ्यांचे स्वरूप
कॉन्र्झव्‍‌र्हेशन हायड्रोलिस्ट, एन्व्हायर्नमेंटल जर्नलिस्ट, एन्व्हायर्नमेंटल फोटोग्राफर, रिसर्च असिस्टंट, लेक्चरर, सीनिअर प्रोग्राम ऑफिसर.
हे शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या व्यक्तींसाठी खालील उद्योगांतून नोकरीच्या संधी उपलब्ध होतात-
अ‍ॅग्रिकल्चरल इंडस्ट्री, डिस्टीलिअरीज, खत कारखाने, अन्नप्रक्रिया उद्योग, वन आणि पर्यावरण खाते, प्रदूषण नियंत्रण कक्ष, वॉटर रिसोस्रेस अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट.
बी.एस.सी. एन्व्हायर्नमेंटल सायन्स अ‍ॅण्ड वॉटर मॅनेजमेंट –
अर्हता- बारावी विज्ञान (६०%), कालावधी- तीन वष्रे, रांची युनिव्हर्सटि, झारखंड. कालिकत युनिव्हर्सटिी, केरळ.
बी.एस.सी. एन्व्हायर्नमेंटल सायन्स –
अर्हता- बारावी विज्ञान (५०%), कालावधी- तीन वष्रे, भारती विद्यापीठ, पुणे, फग्र्युसन कॉलेज, पुणे. मिरज महाविद्यालय, सांगली.
डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंट लॉ –
अर्हता- बारावी पास, कालावधी- दोन वष्रे, गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सटि, गांधीनगर, एस.एस.बी.सी. कॉलेज ऑफ लॉ.
डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन –
अर्हता- बारावी पास, कालावधी- एक वष्रे, गुरुनानक देव युनिव्हर्सटि, अमृतसर, पंजाब.
एम.एस.सी. पोल्युशन कंट्रोल –
अर्हता- विज्ञान पदवीधर, कालावधी- तीन वष्रे, ग्लोबल ओपन युनिव्हर्सटि, नागालँड  इन्स्टिटय़ूट ऑफ प्रोफेशनल स्टडीज, देहराडून, उत्तराखंड.
हेल्थ, सेफ्टी, एन्व्हायर्नमेंट (HSE) या तीनही गोष्टींचे भान बाळगणे आता कोणत्याही उद्योगासाठी वा कारखान्यांसाठी गरजेचे बनले आहे. जागतिक बाजारपेठेत व्यापाराच्या संधी हस्तगत करायच्या असतील तर कोणत्याही उद्योगक्षेत्रात यासंबंधीच्या मानकांचे पालन करणे अत्यावश्यक ठरते.
साहजिकच प्रत्येक उद्योगधंद्यात, उत्पादन उद्योगात पर्यावरणविषयक ज्ञान असणाऱ्या व्यक्ती नेमल्या जातात. पर्यावरणासंबंधी कायदेशीर बाबी हाताळणे, प्रदूषण नियंत्रणाबाबत सरकारी नियमांचे पालन, तत्संबंधी आवश्यक अनुमती पत्रे सरकारी कार्यालयांतून मिळवणे अशा विविध कामांसाठी या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची नेहमी गरज भासते.