मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस ( MNS) मध्ये सामील होण्यासाठी अविवाहित/ घटस्फोटित/ कायद्याने विभक्त/ विधवा (अपत्यविना) महिला अमेदवारांना आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमधील ( AFMC२) ४ वर्षे कालावधीच्या बी.एससी. (नर्सिंग) कोर्स २०२४ करिता प्रवेश. पुढील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये एकूण २२० प्रवेश दिले जातील. (१) ( AFMC), पुणे – प्रवेश क्षमता – ४०; (२) इंडियन नेव्हल हॉस्पिटल शिप ( INHS) अश्विनी, कुलाबा, मुंबई – प्रवेश क्षमता – ४०; (३) आर्मी हॉस्पिटल (रिसर्च अँड रेफरल), नवी दिल्ली – प्रवेश क्षमता – ३०; (४) CH ( आ) बंगलोर – प्रवेश क्षमता – ४०; (५) CH ( CC) लखनौ – प्रवेश क्षमता – ४०; (६) CH ( EC) कलकत्ता – ३० (एकूण २२०).

पात्रता – प्रथम प्रयत्नात १२वी फिजिक्स, केमिस्टी, बायोलॉजी (बॉटनी आणि झूओलॉजी) आणि इंग्लिश विषयांसह किमान सरासरी ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण.

वयोमर्यादा – उमेदवराचा जन्म दि. १ ऑक्टोबर १९९९ ते ३० सप्टेंबर २००७ दरम्यानचा असावा.

शारीरिक मापदंड – उंची किमान १५२ सें.मी. १८ वर्षांखालील मुलींना उंची वाढण्यासाठी २ इंचांची सूट दिली जाईल.

AFMC२ इन्सिटव्यूशन्स मध्ये इ. रू. ( Nursing) कोर्स करिता प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( NTA) द्वारा घेतली जाणारी NEET ( UG) २०२४ परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.

निवड पद्धती – NEET ( UG) २०२४ स्कोअरवर आधारित शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांचे रेफरन्स नंबर www. joinindian army. nic. in या संकेतस्थळावर जाहीर केले जातील. NEET ( UG) २०२४ स्कोअरवर आधारित शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात येईल.

हेही वाचा >>> UPSC ची तयारी : सामान्य बौद्धिक क्षमता आणि माहितीचे आकलन

त्यानंतर ३० मिनिटे कालावधीची अॅब्जेक्टिव्ह टाईप कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ( CBT) घेतली जाईल. टेस्ट ऑफ जनरल इंटेलिजन्स अँड जनरल इंग्लिश ( To GIGE) ज्यात जनरल इन्टेलिजन्स आणि जनरल इंग्लिश यावर आधारित एकूण ४० प्रश्न, वेळ ३० मिनिटे. प्रत्येक प्रश्नास २ गुण असे एकूण ८० गुणांसाठी विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.५ गुण वजा केले जातील. सर्व परीक्षा बेस हॉस्पिटल कॅन्टॉन्मेंट बोर्ड, दिल्ली येथे होतील. त्यानंतर उमेदवारांना नेमून दिलेल्या केंद्रावर सायकॉलॉजिक असेसमेंट टेस्ट ( PAT), इन्टरव्हयू आणि मेडिकल एक्झामिनेशन द्यावी लागेल. इंटरह्यूमध्ये १२ वीच्या अभ्यासक्रमावरील सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि उमेदवारांचे छंद यावर आधारित प्रश्न विचारले जातील. अंतिम निवड ठएएळ २०२४ स्कोअर, CBT, PAT व इन्टरव्हयू मधील एकत्रित गुणवत्तेनुसार (स्पेशल मेडिकल बोर्ड ( SMB) द्वारा मेडिकल फिटनेस तपासून) केली जाईल. नर्सिंग कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना मिलिटरी नर्सिंग, सर्व्हिसेस मध्ये पर्मनंट/शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाईल. जे उमेदवार मेडिकल एक्झामिनेशनमध्ये अपात्र ठरतील, त्यांना अपिल मेडिकल बोर्डाकडे ( AMB) रु. ४०/- भरून २४ तासांच्या आत अपिल करता येईल.

ट्रेनिंग – दरम्यान उमेदवारांना मोफत रेशन, राहण्याची सोय, युनिफॉर्म अलाऊन्स आणि दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

अर्जाचे शुल्क – रु. २००/-. (अजा/ अज उमेदवारांना फी माफ आहे) यशस्वीरित्या ऑनलाइन फी भरल्यावर एक बँक रिफरन्स नंबर जनरेट होईल. (जो त्यांना त्यांच्या रजिस्टर्ड ई-मेलवर पाठविण्यात येईल.) तो उमेदवारांनी जपून ठेवावा. उमेदवारांनी पूर्ण भरलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रिंट १ पेमेंट कन्फर्मेशन पेजची प्रिंट काढून घ्यावी.

अॅडमिट कार्ड www.joinidianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील.

ऑनलाइन फॉर्म भरताना उमेदवारांनी ३ परीक्षा केंद्र निवडावयाची आहेत. (प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम पसंती या नियमानुसार). एन्सीसी ‘ उ’ सर्टिफिकेट धारकांनी अर्जासोबत एन्सीसी ‘ उ’ सर्टिफिकेट अपलोड करणे आवश्यक. SC/ ST सर्टिफिकेट धारकांनी संबंधित सर्टिफिकेट अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक.

शंकासमाधानासाठी संपर्क दूरध्वनी क्रमांक – ०११-२१४११७९३ (१०.०० ते १७.०० वाजे दरम्यान रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळता)

ईमेल आयडी plan.planlv @nic.in ऑनलाइन अर्ज www.joinidianarmy.nic.in या संकेतस्थळावर NEET ( UG) २०२४ चा निकाल जाहीर झाल्यानंतर करता येतील.