● हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर अॅट बॉम्बे ( BHC) (उच्च न्यायालय, मुंबई), नागपूर बेंच, नागपूर येथे ‘क्लार्क’ पदांची भरती. ( Advt. dated 09.05.2024) एकूण रिक्त पदे ४५ (११ पदांची प्रतीक्षा यादी बनविली जाईल.) (दिव्यांग उमेदवारांसाठी २ राखीव पदे लवकरच भरले जाणार आहे.)

वेतन श्रेणी एस-१०१.२९,२००९२,३०० अधिक देय भते.

पात्रता (1) पदवी उत्तीर्ण (कायदा विषयातील पदवीधारकांस प्राधान्य)

(1) इंग्लिश टायपिंगमधील ४० श.प्र.मि. वेगाची शासकीय परीक्षा किया आयटीआय परीक्षा उत्तीर्ण

( B) मान्यताप्राप्त संस्थेकडील MS- Office, MS- Word, Word Star-7 आणि Open Office Org यासह विंडोज आणि लिनक्समधील वर्ड प्रोसेसरवरील प्रोफिशिअन्सी सर्टिफिकेट

वयोमर्यादा खुला प्रवर्ग २१ ते ३८ वर्षे, मागासवर्गीय २१ ते ४३ वर्षे. (योग्य मार्गाने अर्ज करणाऱ्या कोर्टाचे कर्मचारी/ सरकारी कर्मचारी यांना वयाची अट नाही.)

निवड पद्धती (१) शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची यादी मुंबई हायकोर्टाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल, स्क्रीनिंग/लेखी परीक्षा ऑब्जेक्टिक टाईन MCQ (१) मराठी १० प्रश्न (२) मिला २० प्रश्न (३) जनरल नॉलेज १० प्रश्न (४) जनरल इंटेलिजन्स २० प्रश्न, (५) अंकगणित २० प्रश्न, (६) कॉम्प्युटर १० प्रश्न असे एकूण ९० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण ९० गुणांसाठी वेळ ६० मिनिटे. पात्रतेसाठी किमान ४५ गुण आवश्यक.

(२) टायपिंग (इंग्लिश) स्पीड टेस्ट (कॉम्प्युटरवर) १० मिनिटांची (अंदाजे ४०० शब्दांचा उतारा) एकूण २० गुणांसाठी (पात्रतेसाठी किमान १० गुण आवश्यक)

(३) Viva- Voce (मुलाखत) ४० गुणांसाठी.

लेखी परीक्षेतून शॉर्ट लिस्ट झालेल्या उमेदवारांना टायपिंग टेस्टसाठी बोलाविले जाईल टायपिंग टेस्टमधून उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीसाठी गुणवत्तेनुसार बोलाविले जाईल, निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला २ वर्षांच्या प्रोबेशनवर ठेवले जाईल. समाधानकारकरित्या प्रोबेशन कालावधी पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट मिळवावे लागेल

अंतिम निवड स्क्रीनिंग टेस्ट, टायपिंग टेस्ट आणि मुलाखतमधील एकत्रित गुणवतेनुसार केली जाईल.

लेखी परीक्षा, टायपिंग टेस्ट आणि मुलाखतीचे वेळापत्रक, ठिकाण मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. उमेदवारांनी आपल्या इंडिविज्युअल प्रोफाईलमधून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून प्रिंट प्यावी.

अर्जाचे शुल्क रजिस्ट्रेशन की ४. २००/- स्टेट बैंक कलेक्ट पेमेंट लिंकमधून भरता येईल.

ऑनलाइन अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर ( jpg/ jpeg format upto 40 kb each) स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक,

ऑनलाइन अर्ज https:// bombayhighcourt. nic. in या संकेतेस्थळावर दि. २७ मे २०२४ (संध्याकाळी ५ वाजे) पर्यंत करावेत.