PCMC Bharti 2024: जर तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करायची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एका रिक्त जागेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “सल्लागार” पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी वेळ न घालवता अर्ज करावा. हा अर्ज कसा भरावा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती, आणि भरती प्रकियेविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

पद आणि पदसंख्या – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील या रिक्त पदाचे नाव सल्लागार आहे. या पदासाठी फक्त एक जागा आहे.
नोकरी ठिकाण – सल्लागार पदासाठी निवड झालेल्या व्यक्तीची नोकरी ही पिंपरी चिंचवड येथे असेल.
अर्ज पद्धती – या पदासाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – तुम्ही खालील पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.
( मा. आयुक्त यांचे नावे पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कै. नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह (कामगार भवन) नेहरुनगर रोड, पिंपरी १८) अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ४ मार्च २०२४ आहे त्यामुळे वेळ न घालवता तारखेपूर्वी अर्ज करावा.
निवड प्रक्रिया – या पदासाठी निवड ही मुलाखतीद्वारे केली जाईल. पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

हेही वाचा : UPSC-MPSC : भारतामध्ये जमीन सुधारणांची गरज का पडली? त्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?

मुलाखतीचा पत्ता – खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी यावे.
(मा. स्थायी समिती समिती सभागृह, तिसरी मजला, महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत, जुना पुणे- मुंबई रोड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८)
मुलाखतीची तारीख – ५ मार्च २०२४ रोजी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.
अधिकृत वेबसाईट – या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/ या लिंकवर अर्ज करावा.
पगार- पात्र उमेदवाराची सल्लागार पदासाठी निवड झाल्यास ७० हजार पगार दिला जाईल.
शैक्षणिक पात्रता – रेपटाईल्स आणि अॅम्पीबिअन व एव्हेरी मधील कामकाजाचा किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.उमेदवाराला शासकीय स्तरावर वन्यजीव सल्लागार विषयक कामकाजाचा अनुभव असावा. वन्य जीव व सर्प क्षेत्रात naturalist म्हणून कामकाज केल्याचा किमान १० वर्षांचा अनुभव असावा.

अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी सल्लागार पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज करण्यापूर्वी याबाबत सविस्तर माहिती वाचावी.
दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेआधी अर्ज करावा.
पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्वयावर मुलाखतीकरिता हजर राहावे.