अनुराधा सत्यनारायण-प्रभुदेसाई
सतत चिंताग्रस्त राहणाऱ्या शेफालीला माझ्याकडे पाठवण्यात आले. कठीण अशी ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झाम उत्तीर्ण झाल्यानंतर तिने अलीकडेच एका प्रतिष्ठित ‘बी’ स्कूलमध्ये ‘एमबीए’साठी प्रवेश केला होता. परंतु तिला बी स्कूलच्या वातावरणाशी जुळवून घेणे कठीण होत होते. ती प्रेझेंटेशन करायला घाबरत होती आणि २ ते ३ वेळा तर ती तिच्या वर्गात बोलणे महत्त्वाचे असतानाही गप्पच राहिली. शाळेतील टॉपर असूनही आणि प्रवेश परीक्षा रँकरला असूनही तिच्या बाबतीत असे काय घडले? असा अनुभव कसा येऊ शकतो? किंवा ती असे कसे वागू शकते असा प्रश्न बहुतेकांना पडेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

’ स्व-धारणा आणि जगाचा दृष्टिकोन: शेफालीच्या वागण्याचे एक मुख्य कारण म्हणजे आपण स्वत:च्या आणि आपल्या सभोवतालच्या जगाच्या अपेक्षांकडे कसे पाहतो आणि त्यावर कशी कारवाई करतो. जेव्हा आपण प्रथम स्थानी असतो तेव्हा आपण नेहमीच स्वत:कडून उच्च कामगिरी करण्याची अपेक्षा करू लागतो. यात आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षांचाही समावेश होतो. जेव्हा आपल्याला असे वाटते की आपण कमी पडलो आहोत आणि या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, तेव्हा आपण कोलमडून पडतो. अपेक्षा अधोगतीला कारणीभूत ठरतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Point of view all india entrance exam presentation amy